‘मुंढे बचाव पालकमंत्री हटाव’चा नारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन
By admin | Published: December 8, 2015 01:51 AM2015-12-08T01:51:51+5:302015-12-08T01:51:51+5:30
सोलापूर:
Next
स लापूर: सिद्धेश्वर महायात्रेचे नियोजन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केले असून, देवस्थानचे काही पदाधिकारी तसेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे बेछुट आरोप करीत चांगल्या अधिकार्यांना बदनाम करीत आहेत, त्यामुळे मुंढे बचाव आणि पालकमंत्री हटावचा नारा देत सोमवारी महेश गाडेकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवस धरणे आंदोलन केल़े चांगल्या अधिकार्यांच्या पाठीशी सोलापूरकर उभा राहत नाहीत, त्यामुळे सोलापूरची दुर्दशा झाली आह़े आता जिल्हाधिकारी धाडसी आणि योग्य निर्णय घेत असताना पालकमंत्री त्यांच्या विरोधात आहेत़ सोलापूरकरांनी मुंढे यांना साथ देण्यासाठी पुढे याव़े सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी मुंढे यांची बाजू घेतली आहे, मात्र काही मूठभर लोक सोलापूर शहराला वेठीस धरुन विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करीत आहेत, असा आरोप गाडेकर यांनी केला़ यासाठी महेश गाडेकर व 40 ते 50 युवकांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देत मुंढे बचाव, पालकमंत्री हटाव असा नारा दिला़ यावेळी संतोष सुरवसे, आकाश धडवडे, आलिशा गोरडे, माणिक पलंगे, ज्ञानेश्वर ननवरे, रवी माळी, बाबा शेख, देविदास उघडे, कोंडीबा शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होत़ेनव्याने केलेला 60 लाखांचा रस्ता सोडून स्टॉल टाकावेत अशी अपेक्षा जिल्हाधिकार्यांनी व्यक्त केली असताना केवळ उत्पन्न बुडते यासाठीच देवस्थानचे लोक जिल्हाधिकार्यांना विरोध करीत असून, त्यांना पालकमंत्री साथ देत आहेत़ बेताल वक्तव्य करुन शासन विरोधी तसेच जिल्हाधिकारी विरोधी भूमिका घेणार्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या निष्क्रियतेची दखल घेऊन तातडीने त्यांना पदावरुन हटवावे, अशी मागणी महेश गाडेकर यांनी केली आह़े