3 राज्यांसाठी योगी ठरले 'आदित्य', ज्या जागांवर प्रचार केला तेथे काय घडलं? अशी आहे स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 10:14 PM2023-12-03T22:14:43+5:302023-12-03T22:15:53+5:30
या राज्यांमध्ये त्यांनी एकूण 57 सभा करत 92 जागांवर कमळ फुलविण्यासाठी मतदारांना आवाहन केले होते.
देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. यांत तीन राज्यांत भाजपला बंपर विजय मिळाला आहे. तर तेलंगणामध्येही भाजपने अभूतपूर्व अशी कामगिरी केली आहे. महत्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही या राज्यांमध्ये कमळ फुलवण्याची मोठी जबाबदारी होती. या सर्वच राज्यांमध्ये प्रचारासाठी त्यांची जबरदस्त मागणीही होती. या राज्यांमध्ये त्यांनी एकूण 57 सभा करत 92 जागांवर कमळ फुलविण्यासाठी मतदारांना आवाहन केले होते.
मध्ये प्रदेशात काय घडलं? -
मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार येण्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही मोठे योगदान आहे. योगी आदित्यनाथ यांनी येथे चार दिवसांत 16 सभा घेतल्या आणि 29 उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. येथे 22 जागांवर भाजपला विजय मिळाला आहे.
शुजालपूर - इंद्र सिंह परमार - विजयी
कालापीपल - घनश्याम चंद्रवंशी - विजयी
खातेगाव - आशीष गोविंद शर्मा- विजयी
सोनकच्छ - राजेश सोनकर- विजयी
बागली - मुरली भवरा- विजयी
नरसिंहपूर - प्रहलाद सिंह पटेल- विजयी
गाडरवाला - राव उदय प्रताप सिंह- विजयी
तेंदुखेडा - विश्वनाथ सिंह पटेल- विजयी
गोटेगाव - महेंद्र नागेश - विजयी
पन्ना - बृजेंद्र प्रताप सिंह - विजयी
उदयपुरा - नरेंद्र शिवाजी पटेल - विजयी
भोजपुरा - सुरेंद्र पटवा - विजयी
सांची - डॉ. प्रभुराम चौधरी - विजयी
राजनगर - अरविंद पटेरिया - विजयी
चंदला - दिलीप अहिरवार- विजयी
भिंड- नरेंद्र सिंह कुशवाहा- विजयी
ग्वालियर साउथ - नारायण सिंह कुशवाहा- विजयी
ग्वालियर - प्रद्युम्न सिंह तोमर- विजयी
पवई - प्रहलाद लोधी- विजयी
मुंगावली - बृजेंद्र सिंह यादव- विजयी
चंदेरी-जगन्नाथ सिंह रघुवंशी- विजयी
बैरसिया - विष्णु खत्री- विजयी
राजस्थानात काय आहे स्थिती -
राजस्थानात ज्या जागांवर योगी आदित्यनाथ यांनी प्रचार केला तेथील निकाल -
केकडी - शत्रुघ्न गौतम - विजयी
पुष्कर - सुरेश सिंह रावत -विजयी
सांगोद - हिरालाल नागर - विजयी
आहोर - छगन सिंह राजपुरोहित - विजयी
सिवाना - हमीर सिंह भायल - विजयी
कठुमर - रमेश खिंची - विजयी
लालासोट - रामबिलास मीना - विजयी
वल्लभ नगर - उदयलाल डांगी - विजयी
शाहपुरा - लालाराम बैरवा - विजयी
सहाडा - लादूलाल पितलिया - विजयी
मांडल - उदयलाल भडाना - विजयी
जोधपूर शहर - अतुल भंसाली - विजयी
सूरसागर - देवेंद्र जोशी - विजयी
तिजारा - बालकनाथ - विजयी
झोटवाडा - कर्नल राज्यवर्धन सिंह राठौड - विजयी
छत्तीसगडमध्येही योगींची जादू -
छत्तीसगडमध्येही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जादू चालली आहे. येथील पंडरिया येथून भावना बोहरा, कवर्धा येथून विजय शर्मा तर राजनांदगाव येथून डॉ. रमन सिंह विजयी झाले आहेत. तर साजा येथून ईश्वर साहू मोठ्या फरकाने आघाडीवर होते.
जेथून प्रचाराला सुरुवात केली तेथे काय आहे स्थिती? -
ज्या जागेवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. ती जागा भाजपने जिंकली आहे. गेल्या वेळी तेलंगणामध्ये भाजपचा एकच उमेदवार जिंकून आला होता. यावेळी हा आकडा झपाट्याने वाढला आहे. डॉ. पलवाई हरीश बाबू सिरपूरमधून विजयी झाले आहेत, तर टी. राजा सिंह गोशामहलमधून विजयी झाले आहेत. येथूनच योगी आदित्यनाथ यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती.