खासदार ई अहमद यांचं निधन

By admin | Published: February 1, 2017 03:54 AM2017-02-01T03:54:13+5:302017-02-01T04:45:09+5:30

इंडियन युनियन मुस्लीम लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार ई अहमद यांचं निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.

MP E. Ahmed died | खासदार ई अहमद यांचं निधन

खासदार ई अहमद यांचं निधन

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 01 - इंडियन युनियन मुस्लीम लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार ई अहमद यांचं निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. 
मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिभाषण सुरू असताना खासदार ई अहमद यांची प्रकृती बिघडली. यावेळी संसदेतील कर्मचाऱ्यांनी प्रथम त्यांना प्रथमोपचार दिले. त्यानंतर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ई अहमद यांनी मंगळवारी रात्री उशिरा अखेरचा श्वास घेतला. 
केरळमधील मल्लापुरम लोकसभा मतदारसंघाचे ई अहमद खासदार होते. तसेच, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये ई अहमद यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाची जबाबदारी पाड पाडली होती.

Web Title: MP E. Ahmed died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.