साथ देते मी तुला... व्हीलचेअर ढकलत तिनं पूर्ण केले सात फेरे; असं लग्न पाहिलं नसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 12:56 PM2019-06-13T12:56:48+5:302019-06-13T12:57:40+5:30

लग्न हे दोन व्यक्तींचं नव्हे, तर दोन मनांचं मिलन असतं.

mp groom met accident before marriage day performed rituals on wheelchair | साथ देते मी तुला... व्हीलचेअर ढकलत तिनं पूर्ण केले सात फेरे; असं लग्न पाहिलं नसेल

साथ देते मी तुला... व्हीलचेअर ढकलत तिनं पूर्ण केले सात फेरे; असं लग्न पाहिलं नसेल

Next

भोपाळः लग्न हे दोन व्यक्तींचं नव्हे, तर दोन मनांचं मिलन असतं. लग्नात आपल्याला अनेक गोष्टींची तडजोड करून संसाराचा गाडा हाकावा लागतो. एकमेकांचे गुण अन् दोष स्वीकारून पुढे जावं लागतं. मध्य प्रदेशमध्येही असंच दोन मनांचं मिलन घडवून आणणाऱ्या लग्नानं उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मध्य प्रदेशमधील विठ्ठल वाटिकामध्ये मंगळवारी एका नवरदेवनं एका अनोखा निर्णय घेऊन उपस्थितांना आश्चर्यचकीत केलं आहे.

दिलीप सक्सेना आणि विदिशात वास्तव्याला असलेल्या दिप्ती कश्यपचं लग्न आधीपासूनच ठरलेलं होतं. परंतु गेल्या 6 जून रोजी लग्नाची पत्रिका वाटायला गेलेल्या दिलीपचा खिलचीपूर पुलियाजवळ अपघात झाला आणि त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला. या अपघातात नवरदेवाचा डावा पाय आणि उजवा हात फॅक्चर झाला. गंभीर स्थितीमुळे तो 4 दिवस आयसीयूमध्ये होता. तरीही त्यानं लग्नाची तयारी न थांबवता बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला. कारण त्या मुलीचा ठरलेल्या तारखेवरच लग्न करण्याचा निश्चिय ठाम होता. लग्नाच्या सर्व विधी त्या मुलानं व्हीलचेअरवर बसून पूर्ण केल्या.

विशेष म्हणजे नववधूनं त्या व्हीलचेअरवर बसलेल्या नवरदेवाला ढकलत सात फेरे पूर्ण केले. त्यासाठी नवरदेवाच्या मित्रांनीही त्याला मदत केली. पाठवणी करताना ती नवरीमुलगी व्हीलचेअरवरच्या नवऱ्या मुलाला ढकलत गाडीपर्यंत नेले. हे चित्र पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले आणि मित्र परिवार भावुक झाला. 

Web Title: mp groom met accident before marriage day performed rituals on wheelchair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न