खासदार ओवेसींनी भारत-पाकिस्तान T20 विश्वचषक सामन्यावर प्रश्न उपस्थित केले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 02:18 PM2022-10-22T14:18:53+5:302022-10-22T14:21:42+5:30
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्याबाबत बीसीसीआयला टोला लगावला आहे.
नवी दिल्ली : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्याबाबत बीसीसीआयला टोला लगावला आहे. "भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने का खेळत आहे? त्यांना तिथेही खेळायचेही नव्हते. भारतापेक्षा पाकिस्तानसोबतचा क्रिकेट सामना महत्त्वाचा आहे का? आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही, पण त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियात खेळणार आहे. व्वा काय प्रेम आहे, असा टोला ओवेसी यांनी लगावला.
"तुम्ही जर पाकिस्तान विरुद्ध खेळला नाही तर काय होईल? टेलिव्हिजनचे २००० कोटींचे नुकसान होईल, पण भारतापेक्षा जास्त फरक पडतो का?, असा सवालही त्यांनी केला आहे.
तो माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला... ! दिनेश कार्तिकचे रोहित शर्मासाठी भावनिक पत्र...
गेल्या काही दिवसापासून भारत पाकिस्तान सामन्यावरुन चर्चा सुरू आहेत. भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नसल्यामुळे आशिया चषक तटस्थ ठिकाणी खेळवला जाईल असे बीसीसीआयच्या सचिवांनी म्हटले होते.यावर आज खासदार ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली. जय शाह आशियाई क्रिकेट परिषदचे प्रमुख आहेत.
टी-२० विश्वचषकाचा सामना कोण जिंकणार, भारत की पाकिस्तान?, असा प्रश्न ओवेसी यांनी पत्रकारांनी केला. यावर ओवेसी यांनी, 'मला माहित नाही की सामना कोण जिंकेल, पण भारत जिंकावा आणि शमी आणि सिराजसारखी आमची मुलं पाकिस्तानला चिरडून टाकावीत अशी माझी इच्छा आहे, असंही ओवेसी म्हणाले. यावेळी ओवेसी यांनी मुस्लिम खेळाडूंच्या ट्रोलिंगचा मुद्दाही उपस्थित केला.