चप्पलमार प्रकरणानंतर खासदार रवींद्र गायकवाडांची संसदेत उपस्थिती
By admin | Published: April 6, 2017 11:02 AM2017-04-06T11:02:46+5:302017-04-06T11:02:46+5:30
एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारहाण केल्यानंतर वादात सापडलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड अखेर संसदेत पोहोचले आहेत
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारहाण केल्यानंतर वादात सापडलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड अखेर संसदेत पोहोचले आहेत. लोकसभेत गायकवाडांच्या प्रकरणावर शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ 11 वाजता स्थगन प्रस्ताव ठेवणार आहेत. हा स्थगन प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन अमान्य करण्याची शक्यता आहे. मग त्यावेळी त्यांना झिरो अवरमधे बोलू देण्याची संधी मिळावी अशी विनंती करण्यात येईल. त्याआधी संसदेतील शिवसेना पक्ष कार्यालयात खासदारांची बैठक झाली. खासदार रवींद्र गायकवाड सध्या संजय राऊत यांच्या दिल्लीतील घरी आहेत.
संजय राऊत यांनी रवींद्र गायकवाडांसंबंधी विचारलेल्या प्रश्नानर प्रतिक्रिया देताना, "शिवसैनिक कधीच पळ काढत नाही, कोणी सांगितलं हल्ला केला आहे ?", असा सवाल विचारला. तर खासदार आनंदरावर अडसूळ यांनी स्थगन प्रस्तावावर बोलताना "सरकार लक्ष देत नाही आहे. सरकारमध्ये असतानाही शांत बसायचं का ?", अशी विचारणा केली.
Shiv Sainik kabhi bhaagta nahi. Kisnay kaha assault kiya hai?: Sanjay Raut, Shiv Sena on Ravindra Gaikwad pic.twitter.com/73XiVemuZY
— ANI (@ANI_news) April 6, 2017
Sarkar dhyaan nahi deti, sarkar mein hote hue chup baithenge kya?: Shiv Sena MP Anandrao Adsul on adjournment motion in LS on Gaikwad issue pic.twitter.com/ckdG9Vne85
— ANI (@ANI_news) April 6, 2017
काय आहे प्रकरण -
खासदार रवींद्र गायकवाड संसदेच्या अधिवेशनासाठी एअर इंडियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला निघाले होते. त्यांच्याकडे बिझनेस क्लासचे ओपन तिकीट होते. पण आपणास इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आल्याची त्यांची तक्रार होती. मात्र या विमानात बिझनेस क्लास नाही आणि केवळ इकॉनॉमी क्लासच आहे, याची कल्पना खा. गायकवाड यांच्या स्वीय सचिवाला देण्यात आली होती, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी नमूद केले.
विमानात आल्यानंतर आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली. विमान दिल्लीला उतरल्यानंतर सर्व प्रवासी विमानातून खाली उतरले. मात्र खा. गायकवाड विमानातून खाली उतरण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. त्यावेळी खा. गायकवाड यांनी ६0 वर्षीय आर. सुकुमार या ड्युटी मॅनेजरला शिवीगाळ करीत चपलेने मारले.
‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली होती.
या घटनेनंतर भारतीय विमान संघानं रवींद्र गायकवाडांवर बंदी घातली आहे. एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो, गो एअर, स्पाईस जेट या विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्या कृत्याचा जाहीर निषेध करत त्यांना नो फ्लाय यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला टाटा समूहातील कंपन्यांनीही पाठिंबा दर्शवला असून त्यामुळे व्हिसारा आणि एअर एशियाच्या विमानांमध्येही रविंद्र गायकवाडांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.