खासदार आदर्श ग्राम योजना सुरू
By admin | Published: October 12, 2014 02:14 AM2014-10-12T02:14:09+5:302014-10-12T02:14:09+5:30
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भारताचा विकास करण्याच्या उद्देशाने शनिवारी ‘खासदार आदर्श ग्राम योजने’चा शुभारंभ झाला.
Next
>नवी दिल्ली : लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भारताचा विकास करण्याच्या उद्देशाने शनिवारी ‘खासदार आदर्श ग्राम योजने’चा शुभारंभ झाला. या योजनेखाली प्रत्येक खासदाराला 2क्16 र्पयत एका गावाचा आणि 2क्19 र्पयत दोन गावांचा विकास करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ही योजना आपल्या ‘सकारात्मक राजकारणा’मुळे देशभरातील गावागावांत झपाटय़ाने पोहोचेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
ही योजना मागणीवर आधारित असावी, समाजाकडून प्रेरित असावी आणि यात लोकांचा सहभाग असावा, अशा तीन अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या. मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये ही योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत खासदारांना कोणतेही गाव निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. परंतु निवडलेले गाव हे त्याचे/तिचे वा त्याच्या सासरच्या मंडळींचे नसावे. आपण स्वत: वाराणशी या आपल्या मतदारसंघातील गावाची निवड करणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्सर्व 8क्क् खासदारांनी प्रत्येकी तीन गावे निवडली तर 2क्19 र्पयत सुमारे 25क्क् गावांचा विकास होईल. परंतु प्रत्येक खासदाराला 2क्16 र्पयत किमान एका गावाचा विकास करावा लागेल. या योजनेच्या धर्तीवर राज्येही आपल्या आमदारांसाठी अशी योजना सुरू करू शकतात. तसे झाले तर आणखी 6 ते 7 हजार गावांचा विकास होईल.