डास चावला म्हणून खासदाराने थांबवली ट्रेन; डब्ब्याच्या सफाईसाठी अधिकारी तात्काळ दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 03:57 PM2023-04-25T15:57:10+5:302023-04-25T15:57:54+5:30

सामान्य लोकांच्या समस्या कुणी ऐकून घेत नाही, पण एखाद्या मोठ्या व्यक्तीला त्रास झाला की, सगळे तात्काळ हजर होतात.

MP stops train due to mosquito bite; Officials immediately entered to clean the coach | डास चावला म्हणून खासदाराने थांबवली ट्रेन; डब्ब्याच्या सफाईसाठी अधिकारी तात्काळ दाखल

डास चावला म्हणून खासदाराने थांबवली ट्रेन; डब्ब्याच्या सफाईसाठी अधिकारी तात्काळ दाखल

googlenewsNext


उत्तर प्रदेशातून डास चावल्याची एक रंजक घटना समोर आली आहे. इटाहचे खासदार राजवीर सिंह लखनऊच्या चारबाग रेल्वे स्थानकावरुन दिल्लीला निघालेल्या गोमती एक्स्प्रेस (12419) ट्रेनमध्ये प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांना डास चावला. मग काय...खासदाराने तक्रार नोंदवली अन् प्रशासनात खळबळ उडाली.

घाईगडबडीत रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि गाडी थांबवून संपूर्ण बोगीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. बोगीची साफसफाई झाल्यानंतरच गाडी पुढे रवाना करण्यात आली. खासदारासोबत प्रवास करणाऱ्या मान सिंह यांनी ट्विटरवरुन तक्रार नोंदवली. खासदार राजवीर सिंह ट्रेनच्या फर्स्ट एसी डब्यात प्रवास करत आहेत. ट्रेनचे बाथरुम अस्वच्छ असून डास चावत आहेत. त्यामुळे खासदारांना बसणेही कठीण झाले आहे, अशी तक्रार त्यांनी केली.

या ट्विटनंतर अधिकारी अॅक्शन मोडमध्ये आले आणि ट्रेन उन्नाव येथे थांबवण्यात आली. यानंतर संपूर्ण डबा स्वच्छ करण्यात आला. डास गेल्यानंतर संपूर्ण बोगीवर फवारणी करण्यात आली. यानंतर उन्नाव रेल्वे स्थानकावरून ट्रेन दिल्लीला रवाना करण्यात झाली. रेल्वेच्या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 

सामान्य माणसाला प्रवासादरम्यान अशा समस्यांशी सतत झगडावे लागते, तो तक्रार करत राहतो पण सामान्यांचे कुणी ऐकत नाही. पण एखाद्या नेताजीची अडचण झाली की, प्रशासन तत्काळ कारवाई करते. रेल्वेत प्रवास करताना लोक नेहमी तक्रार करतात की त्यांच्या तक्रारी ऐकून घेणारे कोणी नाही. कधी पाणीटंचाई, कधी घाण तर कधी उन्हाळ्यात पंखे खराब झाल्याच्या तक्रारी, अशा समस्यांनी प्रवासी नेहमीच त्रस्त असतात.

Web Title: MP stops train due to mosquito bite; Officials immediately entered to clean the coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.