Ram Mandir Bhumi Pujan : अयोध्येच्या व्यासपीठावरून मोदींनी करावी 'ही' घोषणा, भाजपा नेत्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 01:02 PM2020-08-05T13:02:49+5:302020-08-05T13:10:51+5:30

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली आहे. याच दरम्यान भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अयोध्येच्या व्यासपीठावरून मोदींनी एक घोषणा करावी अशी मागणी केली आहे.

mp subramanian swamy appeal pm modi declare ram setu national heritage monument | Ram Mandir Bhumi Pujan : अयोध्येच्या व्यासपीठावरून मोदींनी करावी 'ही' घोषणा, भाजपा नेत्याची मागणी

Ram Mandir Bhumi Pujan : अयोध्येच्या व्यासपीठावरून मोदींनी करावी 'ही' घोषणा, भाजपा नेत्याची मागणी

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाच्या दिमाखदार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून भूमीपूजन करण्यात येत आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली आहे. याच दरम्यान भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अयोध्येच्या व्यासपीठावरून मोदींनी एक घोषणा करावी अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये मंचावरुनच राम सेतूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भातील एक ट्विट केलं आहे. "आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येमधील मंचावरुन राम सेतू हे राष्ट्रीय स्मारक असल्याची घोषणा करावी. हा सेतू स्थळे व अवशेष अधिनियमाअंतर्ग येणाऱ्या सर्व नियम आणि अटींची पूर्तता करतो. तसेच सर्वोच्च न्यायलायामध्ये मी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील सुनावणीदरम्यान 2015 मध्ये केंद्र सरकारने सादर केलेल्या कागदपत्रांमध्येही असं नमूद करण्यात आलं होतं. यासंदर्भातील संस्कृती मंत्रालयाने दिलेली फाईल पंतप्रधानांच्या टेबलवर आहे" असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाला घरचा आहेर दिला होता. 'राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कोणतंही योगदान नाही' असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं होतं. "राम मंदिरामध्ये पंतप्रधानांचं कोणतंही योगदान नाही. यासाठी सर्व प्रकारच्या चर्चा आम्ही केल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे सरकारच्यावतीने त्यांनी असं कोणतंही काम केलेलं नाही, ज्यामुळे हे सांगता येईल की राम मंदिर उभारलं जात आहे" असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं होतं. तसेच नरेंद्र मोदी यांच्या टेबलवर गेल्या 5 वर्षांपासून फाईल पडून असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. 

सुब्रमण्यम स्वामी यांनी "राम मंदिरासाठी ज्या लोकांनी काम केलं त्यामध्ये राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि अशोक सिंघल यांचा समावेश आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राम मंदिराच्या कामामध्ये आडकाठी आणली होती, अशोक सिंघल यांनीच आपल्याला ही बाब सांगितली होती. राम सेतूला राष्ट्रीय वारसा घोषित करण्याबाबतची फाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलवर गेल्या 5 वर्षांपासून पडून आहे. मात्र त्यांनी यावर स्वाक्षरी केलेली नाही. मी कोर्टात जाऊन यावर आदेश मिळवू शकतो. पण मला वाईट वाटतंय की आमचा पक्ष असतानाही आम्हाला कोर्टात जावं लागत आहे" असं म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Ram Mandir Bhumi Pujan : "राम सगळ्यांचा असण्यातच 'राम' आहे, विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया"

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिर भूमिपूजनाची आठवण म्हणून निमंत्रिताना मिळणार 'ही' खास भेट

Mumbai Rain Updates : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; रस्ते वाहतुकीला फटका

Ram Mandir Bhumi Pujan : "आजचा दिवस ऐतिहासिक, राम मंदिरामुळे देशात 'रामराज्य' येणार"

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मोदी देशाला संबोधित करणार, असा असेल संपूर्ण कार्यक्रम

Web Title: mp subramanian swamy appeal pm modi declare ram setu national heritage monument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.