हृदयस्पर्शी! गंभीर आजाराशी लढतेय 'माही', जीव वाचवण्यासाठी हवेत 2.5 कोटी; मोदींकडे मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 10:15 AM2021-08-22T10:15:44+5:302021-08-22T10:19:43+5:30

7 year old mahi battling with disorder : दिल्लीतील 7 वर्षीय माहीला गंभीर आजार झाला आहे. हा अत्यंत दुर्मिळ आजार असून लाखो-करोडो मुलांमध्ये फारच क्वचित मुलांना होतो.

a mps iv a enzyme 7 year old mahi battling with disorder disease father upset in arranging money | हृदयस्पर्शी! गंभीर आजाराशी लढतेय 'माही', जीव वाचवण्यासाठी हवेत 2.5 कोटी; मोदींकडे मागितली मदत

हृदयस्पर्शी! गंभीर आजाराशी लढतेय 'माही', जीव वाचवण्यासाठी हवेत 2.5 कोटी; मोदींकडे मागितली मदत

Next

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक मन सुन्न करणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशीच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील चिमुकलीला दुर्मीळ आजार झाला आहे. मात्र उपचारासाठी येणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च करणं कुटुंबीयांसाठी कठीण झालं आहे. दिल्लीतील 7 वर्षीय माहीला गंभीर आजार झाला आहे. हा अत्यंत दुर्मिळ आजार असून लाखो-करोडो मुलांमध्ये फारच क्वचित मुलांना होतो. माहीचे वडील सुशील कुमार यांनी  दिल्ली पोलीस आयुक्तांकडे मदत मागितली असून माहीने स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना एका व्हिडिओद्वारे मदत करण्याची विनंती केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या केंद्रीय विद्यालयात दुसरीत शिकणाऱ्या अवघ्या 7 वर्षांच्या माहीला अत्यंत दुर्मीळ असा ‘A (MPS) IV A ENZYME DISORDER’ हा आजार झाला आहे. या आजारामध्ये रुग्णाच्या हाडांची वाढ थांबते आणि हळूहळू शरीराची वाढदेखील खुंटते. हाडांचे नुकसान वाढत जाते तसा रुग्णही अपंग होतो आणि आजार अधिक तीव्र झाल्यास मृत्यूचाही धोका असतो. आतापर्यंत माहीच्या उपचारांसाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत. तिच्या वडिलांनी यासाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतले आहे, पण माहीच्या उपचारासाठी 2 कोटी 43 लाख रुपयांची गरज आहे, जी रक्कम जमा करणं अशक्य आहे. 

कुटुंबीयांनी माहीच्या उपचारासाठी पंतप्रधानांकडे मदत मागितली आहे. याआधी मोदींनी अशा रुग्णांच्या उपचारासाठी तत्काळ मदतीचे आदेश दिल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे माहीच्या बाबतीतही तिच्या कुटुंबाला आशा वाटत आहे. दिल्लीतील एम्स (AIIMS) रूग्णालयात अशा एका रुग्णावर उपचार सुरू असल्यानं माहीवर एम्समध्ये चांगले उपचार होतील, अशी आशा माहीचे वडील सुशील कुमार यांना वाटत आहे. मात्र या आजारावरील आवश्यक औषधे ब्राझील, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्ये उपलब्ध आहेत, ती अतिशय महाग आहेत. सुशील कुमार हे एमटीएस (MTS) म्हणजेच दिल्ली पोलीस दलात (Delhi Police Force) चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. 

सुशील यांना महिना 27 हजार रुपये पगार असलेल्याने एवढी रक्कम उभारणे अशक्यच आहे. गेल्या 15 वर्षांपासून दिल्ली पोलीस मुख्यालयात तैनात असून, आपल्या दोन मुली आणि पत्नीसह ते दिल्लीच्या सरस्वती विहार पोलीस कॉलनीत राहतात. माहीच्या उपचारासाठी त्यांनी 10 लाखांचे वैयक्तिक कर्ज, 1 लाख रुपयांचे पोलीस कर्ज घेतलं असून, अशा केसेसमध्ये कर्मचाऱ्यांना विभागाकडून मिळणारी मदतसुद्धा माहीच्या आतापर्यंतच्या उपचारासाठी खर्च झाली आहे. आपल्या चिमुकलीचा जीव वाचावा यासाठी तिच्या उपचारासाठी आवश्यक रक्कम उभी करण्यासाठी सुशील कुमार धडपडत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

Web Title: a mps iv a enzyme 7 year old mahi battling with disorder disease father upset in arranging money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.