राज्याच्या खासदारांचे दिल्लीत ‘नटसम्राट’!

By admin | Published: July 6, 2014 02:02 AM2014-07-06T02:02:18+5:302014-07-06T03:28:53+5:30

‘नटसम्राट’मधील अप्पा बेलवणकरांचे पात्र आजवर अनेक दिग्गजांनी साकारलं खरं, पण आता तीच भूमिका महाराष्ट्रातील खासदार दिल्लीत साकारत आहेत!

MPs of the state's 'Natsamastra' in Delhi! | राज्याच्या खासदारांचे दिल्लीत ‘नटसम्राट’!

राज्याच्या खासदारांचे दिल्लीत ‘नटसम्राट’!

Next
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
‘घर देता कोणी घर?,’असं म्हणत वि.वा.शिरवाडकरांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘नटसम्राट’मधील अप्पा बेलवणकरांचे पात्र आजवर अनेक दिग्गजांनी साकारलं खरं, पण आता तीच भूमिका महाराष्ट्रातील खासदार दिल्लीत साकारत आहेत! 
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,पहिल्यांदाच खासदार झालेले काही माजी मंत्री, राज्यमंत्री, महापौरांचा सध्याचा पत्ता महाराष्ट्र सदन असाच आहे.राज्यातील 48 पैकी 30 नवे खासदार महाराष्ट्र सदनात राहत आहेत.  
 नव्याने निवड झाल्यानंतर हे खासदार दीड महिन्यांपूर्वी  दिल्लीत पोहोचले, आलीशान महाराष्ट्र सदनात राहूही लागले पण हक्काचे घर मिळत नसल्याने सदनातही अनेकांचे मन रमत नाही.काहींनी  पंचतारांकित हॉटेल्स जवळ केली, तर काही दिवसभर थांबून पुन्हा आपले गाव गाठू लागले. आतार्पयत खासदारांची अशी मुसाफिरी ठीक होती, पण सोमवारपासून सव्वा महिना चालणारे संसदेचे अर्थसंकल्पीय सत्र सुरू होत असल्यान ेया खासदारांनी  हक्काचे घर मिळावे यासाठी तगादा सुरु केला आहे. पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांची संख्या यावेळी बरीच मोठी असल्याने घरांची ही समस्या बिकट झाली आहे. पण सध्या सरकारी निवासस्थानात राहात असलेल्या पण ताज्या निवडणुकीत निवडून न आलल्या एकाही खासदाराला ‘एक्स्टेंशन’ दिले जाणार नाही. नियमानुसार माजी खासदारांना घरे खाली करण्यासाठी अजून दोन आठवडय़ांचा अवधी आहे. तो संपल्यावर सर्व नव्या खासदारांना 31 जुलैर्पयत घरे नक्की मिळतील,  असे अधिकृत सूत्रंकडून सांगण्यात आले. 
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, की सध्या तरी घाई नाही. कार्यकत्र्याना नाराज करता येत नाही, जेऊ- खाऊ घातल्या शिवाय कार्यकर्ता समाधानाचा ढेकरही देत नाही. राहायची सोय नाही नंतर या, असे एका खासदाराने गावाकडून फोन आला तेव्हा सांगून पाहिले तेव्हा सध्या धर्मशाळेत राहतो. हरिव्दार, आग्रा, मथुरा आटोपतो पण दिल्लीत सोय करा,अशी गळच घातली.
 काही विद्यार्थी परीक्षांसाठी येत आहेत, काही जण उपचारासाठी येत आहेत, त्यांना थांबायचे हक्काचे ठिकाण खासदाराचे घर असल्याने ‘नव्या नव्या खासदारांची‘ अडचण झाली आहे. त्यांच्या सदनातील खोलीत ‘अतिथी देवो भव:’म्हणून त्यांचे पाहुणो राहत असल्याचे चित्र दिसून येते. 
 
मोदी लाटेमुळे आली अडचण
च्मोदी लाटेत 543 पैकी 311 खासदार पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचले. यापूर्वी साधारणत: शंभर ते सव्वाशे खासदारांची अदलाबदल होत असे, त्यामुळे  व्यवस्थापन करणा:याल संसदेच्या हौसिंग समितीला नव्यांना घरे देणो पार कठीण जात नव्हते.
 
च्या समितीने ज्या माजी खासदारांच्या ताब्यात घरे आहे,अशांना पत्र देऊन ती रिकामी करण्यास सांगितल्यावर एव्हाना 16क् घरे रिकामी झाली. या आठवडय़ात अजून 45-5क् होतील. माजी खासदाराने उशिरात उशिरा  दोन महिन्यानंतर स्वत:हून घर सरकारला परत करावे,असा नियम आहे. 
 
च्निकालानंतर एक महिन्यात घर रिकामे करावे. पहिल्या महिन्यात सवलतीचे घर भाडे आकारले जाते, दुस:या महिन्यात निवासाचा व्यावसायिक दर लागू होतो. 4क् हजार ते दोन लाख  रूपये महिना भाडे भरावे लागते.
 
च्राजधानीत 425घरे, बंगले खासदारांसाठी आहेत. फ्लॅट, 
स्वतंत्र घरे, डुप्लेक्स, मोठे बंगले खासदारांना त्यांच्या ‘टर्म’नुसार दिले जातात. 

 

Web Title: MPs of the state's 'Natsamastra' in Delhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.