खासदारांना हवी धूम्रपानाची सोय, संसदेत होणार स्मोकिंग झोन

By admin | Published: August 6, 2015 10:15 AM2015-08-06T10:15:48+5:302015-08-06T12:23:26+5:30

संसदेच्या आतमध्ये खासदारांसाठी स्मोकिंग झोन सुरु करण्याच्या हालचाली वेग धरत असून तंबाखूविरोधी मोहीम राबवणा-या सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

MPs want smoking, smoking zone in Parliament | खासदारांना हवी धूम्रपानाची सोय, संसदेत होणार स्मोकिंग झोन

खासदारांना हवी धूम्रपानाची सोय, संसदेत होणार स्मोकिंग झोन

Next
>ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. ६ - संसदेच्या आतमध्ये खासदारांसाठी स्मोकिंग झोन सुरु करण्याच्या हालचाली वेग धरत असून तंबाखूविरोधी मोहीम राबवणा-या सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकारावर आक्षेप घेतला आहे. तंबाखूविरोधी कायद्यानुसार सार्वजनिक स्थळात संसदेचा समावेश असून संसदेच्या आतमध्येच स्मोकिंग झोन तयार केल्यास या कायद्याचा भंग होईल असे पत्रच सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पाठवले आहे. 
संसदेच्या आतमध्ये सेंट्रल हॉललगतची वेटिंग रुम सध्या स्मोकिंग झोन म्हणून वापरली जात आहे. या प्रकारावर तंबाखूविरोधी मोहीम राबवणा-या कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. तंबाखूविरोधी कायद्यातील कलम ४ नुसार २००८ पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणांमध्ये संसदेचाही समावेश आहे. ज्या संसदेने कायदा तयार केला त्याच संसदेत या कायद्याचे उल्लंघन करणे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक संघटनांनी दिली आहे. 

Web Title: MPs want smoking, smoking zone in Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.