खासदारांना स्वस्तात जेवण मिळणे हाेणार बंद!; संसद उपाहारगृहाला यापुढे अनुदान नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 01:32 AM2021-01-20T01:32:08+5:302021-01-20T01:32:29+5:30
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीबाबत पत्रकारांना माहिती देत असताना बिर्ला यांनी सांगितले की, यापुढे संसदेतील उपहारगृह उत्तर रेल्वेऐवजी भारतीय पर्यटन विकास महामंडळ (आयटीडीसी) यांच्याकडून चालविले जाईल.
नवी दिल्ली :संसद भवन परिसरातील उपहारगृहात खाद्यपदार्थांसाठी दिले जाणारे अनुदान रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी दिली. यामुळे तिथे खासदारांना सवलतीच्या किमतीत खाद्यपदार्थ मिळू शकणार नाहीत. खासदारांना यासाठी अधिक किंमत मोजावी लागेल. यामुळे लोकसभा सचिवालयाच्या खर्चात वर्षाकाठी आठ कोटींची बचत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीबाबत पत्रकारांना माहिती देत असताना बिर्ला यांनी सांगितले की, यापुढे संसदेतील उपहारगृह उत्तर रेल्वेऐवजी भारतीय पर्यटन विकास महामंडळ (आयटीडीसी) यांच्याकडून चालविले जाईल.
असे हाेते सवलतीचे दर -
बिर्याणी - ६५
थाळी - ३५
साधा डोसा - १२
सूप - १४
ब्रेड बटर - ६
कॉफी - ५
चहा - ५
चपाती - २