"मंत्री जी जेब में हाथ डालकर मत आया करो..."! भरसंसदेत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला भडकले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 01:56 PM2024-07-26T13:56:34+5:302024-07-26T13:58:29+5:30
यानंतर, मंत्री महोदयांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला. यावर ते (ओम बिर्ला) आणखी भडकले...
सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून 2024 च्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. खासदार प्रश्न विचारत आहेत. काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी आज लोकसभेत स्थगन प्रस्ताव नोटीस दिली आणि सीमेवरील परिस्थिती तसेच चीनसोबतच्या व्यापारातील मोठ्या घाट्यासंदर्भात चर्चेची मागणी केली. दरम्यान, आज लोकसभेत एक धक्कादायक घटना घडली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला एका मंत्र्यावरच संतापले. यातच, आज लोकसभेत एक धक्कादायक घटनाही घडली. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला एका मंत्र्यावर जोबरदार भडकले.
झाले असे की, संसदेची कार्यवाही सुरू असतानाच एक मंत्री महोदय खिशात हात टाकून संसदेत आले. यावरून अध्यक्ष ओम बिरला संतापले. आपली नाराजी व्यक्त करत ओम बिर्ला म्हणाले, ‘मंत्रीजी हात खिशातून बाहेर. एक तर माननीय सदस्यांनो मी आपल्याला आग्रह करतो की, हात खिशात टाकून सभागृहात येऊ नका. ठीक आहे ना...’
म्हणून मंत्री महोदयांना सुनावले… -
यानंतर, मंत्री महोदयांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला. यावर ते (ओम बिर्ला) आणखी भडकले. ते म्हणाले, "मंत्री महोदय आपण मधेच का बोलत आहात? काय विचारायचे आहे जरा सांगा. हात खिशात टाकण्याला आपण परवानगी द्याल का? दुसरी विनंती अशी आहे की, जेव्हा एखादा माननीय सदस्य बोलत असेल तेव्हा कुणीही त्याला क्रॉस करून समोर बसू नये. त्यांच्या मागे जाऊन बसावे."
तत्पूर्वी, 23 जुलैला सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर शुक्रवारीही संसदेत चर्चा सुरू आहे. गुरुवारी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते तथा खासदार राघव चढ्ढा यांनी राज्यसभेत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. भारतात कर इंग्लंडप्रमाणे वसूल केला जातो. मात्र, सेवा सोमालियाप्रमाणे दिल्या जातात. गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने कर लावत सर्वसामान्यांचे रक्त शोषले, असा आरोप केला होता.