व्यंकय्या नायडू यांचे मोदींनी केले कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:57 AM2017-08-12T01:57:25+5:302017-08-12T01:57:39+5:30
व्यंकय्या नायडू यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी उपराष्ट्रपतिपदाची शपथ दिली. नायडू हे देशाचे १३वे उपराष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक केंद्रीय नेते तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते.
- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : व्यंकय्या नायडू यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी उपराष्ट्रपतिपदाची शपथ दिली. नायडू हे देशाचे १३वे उपराष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक केंद्रीय नेते तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते.
शपथ ग्रहण केल्यानंतर व्यंकय्या नायडू संसदेत आले, त्या वेळी राज्यसभेत सर्व पक्षांच्या खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले. नायडू हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले उपराष्ट्रपती आहेत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. नायडू यांनी राज्यसभेत बराच काळ काम केले आहे. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज कसे चालते याची त्यांना माहिती असून, ते सभापती या नात्याने सभागृहाचे कामकाज उत्तम प्रकारे हाताळतील, असे मोदी म्हणाले.
‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजना’ ही नायडू यांची देशाला भेट आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, शेती व शेतकºयांच्या समस्यांची त्यांना चांगली जाणीव आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही नायडू यांचे कौतुक केले. तळागाळातून आलेल्या व्यक्तीची देशाच्या उपराष्ट्रपतिपदी निवड होणे ही मोठी बाब असून, हेच आपल्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे, असे आझाद म्हणाले.
मोदींची शेरोशायरी
नायडू यांचे कौतुक करतानाच, पंतप्रधान मोदी यांनी एक शेर ऐकवत उपराष्ट्रपतींना त्यांच्या जबाबदारीची जाणीवही करून
दिली. ते म्हणाले...
अमल करो ऐसा सदन में
अमल करो ऐसा सदन में
जहां से गुजरे तुम्हारी नजर
उधर से तुम्हे सलाम आए