मिस्टर PM, तामिळनाडूला काळजीपूर्वक हाताळा; हिंदी, सीमांकनाच्या मुद्द्यावरुन विजयचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 22:12 IST2025-03-28T22:09:45+5:302025-03-28T22:12:10+5:30

Tamilaga Vettri Kazhagam: साउथ सुपरस्टार आणि तमिलगा वेत्री कळघम पक्षाचे प्रमुख विजयने सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत.

'Mr PM, handle Tamil Nadu carefully', TVK chief Vijay criticizes the central government | मिस्टर PM, तामिळनाडूला काळजीपूर्वक हाताळा; हिंदी, सीमांकनाच्या मुद्द्यावरुन विजयचा संताप

मिस्टर PM, तामिळनाडूला काळजीपूर्वक हाताळा; हिंदी, सीमांकनाच्या मुद्द्यावरुन विजयचा संताप

Tamilaga Vettri Kazhagam: साउथ सुपरस्टार आणि तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे प्रमुख थालापथी विजय पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे खेळाडू मानले जात आहेत. शुक्रवारी (28 मार्च 2025) पक्षाच्या पहिल्या बैठकीत त्यांनी द्रमुक आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान विजय यांनी दावा केला की, एकीकडे द्रमुकची काँग्रेससोबत युती आहे, तर दुसरीकडे त्यांनी भाजपशीही गुप्तपणे हातमिळवणी केली आहे. 

केंद्राच्या अनेक योजनांची खिल्ली
बैठकीदरम्यान, TVK प्रमुखांनी सीमांकन, हिंदी भाषा, GST संकलन, महिलांविरुद्धचे वाढते गुन्हे आणि मोदी सरकारच्या वन नेशन वन इलेक्शन धोरणाचीही खिल्ली उडवली. फिल्मी स्टाईलमध्ये सरकारवर ताशेरे ओढत विजय म्हणाला, हे वारे आता थांबणार नाही. या वाऱ्याला थांबवाल, तर त्याचे जोरदार वादळ होईल. 'मिस्टर पंतप्रधान, तामिळनाडूला काळजीपूर्वक हाताळा. आम्हाला नेहमी वाईट वागणूक मिळाली आहे. आम्ही फुटीरतावादी शक्तींच्या विरोधात आहोत, तर बंधुता, सामाजिक न्याय आणि जातीय सलोख्याच्या बाजूने आहोत.

राज्यात दोन भाषा धोरण सुरू ठेवावे
आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच विजय द्रमुक आणि भाजपवर निशाणा साधत आहेत आणि त्यांच्यावर मिलीभगतचे आरोप करत आहेत. गेल्या महिन्यात तमिलगा वेत्री कळघम पक्षाच्या प्रमुखांनी हिंदी लादल्याबद्दल संताप व्यक्त केला होता आणि म्हटले होते की, एक गातो आणि दुसरा नाचतो, पण दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्रिभाषा धोरणाला विरोध करत ते म्हणाले की, राज्याचे सध्याचे द्विभाषिक धोरण असून, त्याअंतर्गत विद्यार्थी इंग्रजी आणि तामिळ शिकवली जाते. या धोरणात बदल करू नये.

वक्फ विधेयक रद्द करण्याची मागणी
वक्फ कायद्यातील बदलांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. गेल्या वर्षी केंद्राने वक्फ कायद्यात 44 बदल सुचवले होते, ज्यामध्ये बिगर मुस्लिम सदस्यांना बोर्डात नामनिर्देशित करण्याचा समावेश होता. हे विधेयक जेपीसीकडे पाठवण्यात आले होते, जिथे 23 बदल सुचवले गेले, त्यापैकी 14 केंद्राने स्वीकारले होते. आजच्या बैठकीत टीव्हीकेने हे विधेयक रद्द करण्याचे आवाहन करणारा ठराव मंजूर केला.

Web Title: 'Mr PM, handle Tamil Nadu carefully', TVK chief Vijay criticizes the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.