श्री स्वामीनारायण शिक्षापत्रीचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:14 PM2022-04-19T12:14:28+5:302022-04-19T12:15:27+5:30

वडताळघाममध्ये राहून भगवान श्री स्वामीनारायणांनी १९६ वर्षांपूर्वी संस्कृत भाषेत २१२ श्लोकांची रचना केली. सध्या संस्कृतसह हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या भाषांमध्ये ही शिक्षापत्री उपलब्ध आहे.

Mr. Swaminarayan Shikshapatri included in Guinness World Records | श्री स्वामीनारायण शिक्षापत्रीचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये समावेश

श्री स्वामीनारायण शिक्षापत्रीचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये समावेश

googlenewsNext

मुंबई : जगातील सर्वात मोठा हस्तलिखित ग्रंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान श्री स्वामीनारायणांच्या शिक्षापत्रीचा समावेश गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि ऑल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाला आहे. या ग्रंथाचे वजन १२० किलो इतके असून, तो ८ फूट रुंद आणि ५.५ फूट उंच आहे. गुजरातचे परमपूज्य श्री ज्ञानजीवनदासजी स्वामी कुंडलधाम यांच्या प्रेरणेने तयार केलेली ही शिक्षापत्री वडताळघाम येथे १० एप्रिलला समर्पित करण्यात आली.

वडताळघाममध्ये राहून भगवान श्री स्वामीनारायणांनी १९६ वर्षांपूर्वी संस्कृत भाषेत २१२ श्लोकांची रचना केली. सध्या संस्कृतसह हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या भाषांमध्ये ही शिक्षापत्री उपलब्ध आहे. परमपूज्य श्री ज्ञानजीवनदासजी स्वामी यांच्या प्रेरणेने ही शिक्षापत्री तयार करण्यात आली आहे. मानवजाती आणि भक्तांच्या कल्याणासाठी श्री स्वामीनारायण यांचे आशीर्वाद आणि आज्ञा पोहोचवण्याच्या उद्देशाने हे ग्रंथ समर्पण पार पडले.

२४ तासांत ग्रंथ तयार
- श्री स्वामीनारायण भगवान यांनी १९६ वर्षांपूर्वी ही शिक्षापत्री स्वत: 
वडताळमध्ये राहून लिहिली होती. 
- या चित्ररूपी शिक्षापत्रीमध्ये २१२ श्लोक आहेत. २२४ हस्तलिखिते आणि चित्रलेखांचा समावेश या ग्रंथात आढळतो. 
- महत्त्वाची बाब म्हणजे कुंडलधामच्या १५० हरिभक्तांनी केवळ २४ तासांमध्ये हा ग्रंथ तयार केला आहे. 
- तर १० तासांमध्ये ग्रंथ बांधणीचे कार्य करण्यात आले. संपूर्ण पुस्तकात कुठेही छपाई यंत्राचा उपयोग केला नाही.
 

Web Title: Mr. Swaminarayan Shikshapatri included in Guinness World Records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.