MTNL Mobile Services : ‘एमटीएनएलची सेवा चांगली’; दूरसंचार राज्यमंत्र्यांनी संसदेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 06:19 AM2021-12-16T06:19:32+5:302021-12-16T06:21:53+5:30
MTNL Mumbai : मुंबईत बीटीएस टॉवरची संख्या पुरेशी असल्याचे देवसिंग यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : मुंबई व दिल्ली येथील एमटीएनएल या दूरसंचार कंपनीची सेवा चांगली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवसिंग चौहान यांनी लेखी उत्तरात दिली.
यासंदर्भात शिवसेनेचे सदस्य अरविंद सावंत (दक्षिण मुंबई) यांनी प्रश्न विचारला होता. मुंबईत एमटीएनएलचे १५५३ टॉवर आहेत. मुंबईत बीटीएस टॉवरची संख्या पुरेशी असल्याचे देवसिंग यांनी म्हटले आहे. स्टार्ट अप उद्योगातून महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात १ लाख १४ हजारावर युवकांना रोजगार मिळाल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी लोकसभेत लेखी प्रश्नांच्या उत्तरात दिली. या संदर्भात अपक्ष सदस्य नवनीत राणा (अमरावती) यांनी लेखी प्रश्न विचारला होता.
पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या भारत गौरव रेल्वेने पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांनाही जाता येईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लेखी उत्तरात दिली. यासंदर्भात डॉ. हिना गावित, श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, उन्मेष पाटील यांनी लेखी प्रश्न विचारला होता.