Mucormycosis: मोठा दिलासा! ब्लॅक फंगसवरील औषधाचे उत्पादन वाढविणार; ५ कंपन्यांना परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 08:13 PM2021-05-22T20:13:03+5:302021-05-22T20:45:55+5:30
Black Fungus Amphotericin B production: ब्लॅक फंगसवरील औषधांची कमतरता आहे. यासाठी पाच कंपन्यांना म्युकरमायकोसिसवरील एम्फोटेरिसीन-बी औषध निर्मिती करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्या जे उत्पादक आहेत, ते देखील या औषधाचे उत्पादन वाढविणार आहेत.
कोरोना महामारीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. गेल्या 20 दिवसांपासून देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. 3 मे रोजी 17.13 टक्के रुग्ण उपचार घेत होते, आता हा आकडा 11.12 टक्क्यांवर आला आहे. रिकव्हरी रेटदेखील वाढून 87.76 टक्क्यांवर गेला आहे. आतापर्यंत देशभरात 2 कोटी 30 लाख लोक बरे झाले आहेत. याचबरोबर ब्लॅक फंगसवर परिणामकारक औषध एम्फोटेरिसीन-बीच्या (Amphotericin B) मुबलक पुरवठ्यासाठी पाच कंपन्यांना उत्पादनासाठी परवानगी देण्यात आली आहे. ( Ministry of Pharma is coordinating with Ministry of Health for providing license to 5 addl manufacturers of Amphotericin B: Lav Agarwal,)
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांत देशात 2,57,000 कोरोनाबाधित सापडले. 3,57,630 लोक बरे झाले. 78 टक्के नवे रुग्ण हे 10 राज्यांतील आहेत. तर 7 राज्यांत दिवसाला 10000 हून अधिक रुग्ण सापडत आहेत.
Amphotericin B was available in the country in limited supply. Its availability & supply is now being increased. Ministry of Pharma is coordinating with Ministry of Health for providing license to 5 addl manufacturers: Lav Agarwal, Joint Secy, Union Health Ministry#BlackFunguspic.twitter.com/A2B0gO3DoG
— ANI (@ANI) May 22, 2021
13-19 फेब्रुवारीमध्ये देशात 6.96 लाख टेस्ट प्रतिदिन होत होत्या. हा आकडा आता 19.46 लाख एवढ्या चाचण्या केल्या जात आहेत. पॉझिटिव्हीटी रेटमध्ये गेल्या २ आठवड्यांमध्ये सुधारणा होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 20,66,285 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
लसीकरण
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत देशात 18.41 कोटी लसींचे डोस 45 हून अधिक वर्षांच्या नागरिकांना, फ्रंटलाईन वर्करना देण्यात आल्या आहेत. तर 18 ते 44 वयोगटासाठी केंद्राकडून 92 लाख डोस उपलब्ध करण्यात आले आहेत.
There are only 7 states that are reporting more than 10,000 cases & 6 states with 5,000-10,000 cases. 6 states are reporting a high number of deaths. These are Maharashtra, Karnataka, Tamil Nadu, UP, Punjab and Delhi: Lav Agarwal, Joint Secretary, Union Health Ministry#COVID19pic.twitter.com/bNBMbkuP45
— ANI (@ANI) May 22, 2021
ब्लॅक फंगसवरील औषधांची कमतरता आहे. यासाठी पाच कंपन्यांना म्युकरमायकोसिसवरील एम्फोटेरिसीन-बी औषध निर्मिती करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्या जे उत्पादक आहेत, ते देखील या औषधाचे उत्पादन वाढविणार आहेत.
व्हॅक्सिन पासपोर्ट
व्हॅक्सिन पासपोर्टवर आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, य़ावर WHO च्या स्तरावर अद्याप कोणतीही सहमती झालेली नाही. चर्चा केली जात आहे. यामुळे जेव्हा जागतिक स्तरावर तयारी होईल तेव्हा यावरील निर्णय घेतला जाणार आहे.