Mucormycosis: देशातील पहिलीच केस! ब्लॅग फंगस थेट मेंदूत पोहोचला; डॉक्टरदेखील हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 12:39 PM2021-05-21T12:39:10+5:302021-05-21T12:40:37+5:30
Mucormycosis: ब्लॅग फंगसचा धोका वाढला; देशात आतापर्यंत ५५०० रुग्णांची नोंद; सव्वाशेहून अधिक मृत्यूमुखी
सूरत: देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र कोरोनावर मात केलेल्या काही रुग्णांना ब्लॅक फंगस (Mucormycosis) आजार होत असल्याचं समोर आलं आहे. ब्लॅक फंगस आजार झालेल्यांचा आकडा ५ हजार ५०० वर पोहोचला आहे. या आजारामुळे आतापर्यंत सव्वाशेहून अधिक जणांचा जीव गेला आहे. त्यातच आता ब्लॅक फंगस थेट मेंदूवर वार करत असल्याचं दिसून आलं आहे. गुजरातच्या सूरतमध्ये अशी पहिलीच केस आढळून आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
भय इथले संपत नाही! कोरोना पाठोपाठ राज्यावर आणखी एक संकट; टेन्शन वाढलं
सूरतमध्ये एका २३ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली. उपचार वेळेत मिळाल्यानं तरुणानं कोरोनावर मात केली. मात्र त्यानंतर त्याला ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) आजार झाला. आतापर्यंत ब्लॅक फंगसमुळे फुफ्फुसं, डोळ्यांना धोका पोहोचत होता. मात्र आता ब्लॅक फंगस थेट मेंदूपर्यंत पोहोचला आहे. हा प्रकार पहिल्यांदाच पाहत असल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदींनी स्वत:चाच शब्द फिरवला; यू टर्नमुळे कोरोना संकट आणखी वाढण्याचा धोका
ब्लॅक फंगस थेट मेंदूपर्यंत पोहोचल्यानं आता डॉक्टरांनी रुग्णांना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रुग्णांनी एमआरआय स्कॅन करावं. कारण ब्लॅक फंगस मेंदूपर्यंत पोहोचल्याची माहिती एखाद्या व्यक्तीला भोवळ आल्यानंतर किंवा तो बेशुद्ध पडल्यानंतरचे समजते. सूरतमधील तरुणाच्या मेंदूत ब्लॅक फंगस रक्ताच्या माध्यमातून पोहोचला असावा, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, इंडियन मेडिकल काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक सूचनांमध्येही भोवळ येण्याचा किंवा डोक्यात सूज येण्याचा उल्लेख नाही.
कोणाला होऊ शकतो ब्लॅक फंगस?
- कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचार घेताना ज्यांना स्टेरॉईड्स (डेक्सामिथाजोन, मिथाइल, प्रेडनिसोलोन) देण्यात आले आहेत.
- कोरोना उपचारादरम्यान ऑक्सिजन सपोर्ट किंवा आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं असल्यास
- कॅन्सर, किडनी, ट्रान्सप्लांटची औषधं सुरू असल्यास