Mucormycosis : म्युकरमायकोसिस अशाप्रकारे करतो शरीरावर हल्ला, ही आहेत संसर्गाची कारणं; तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 05:54 PM2021-05-15T17:54:51+5:302021-05-15T18:06:52+5:30
Mucormycosis : कोरोनासोबतच म्युकरमायकोसिसचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
नवी दिल्ली - एकीकडे संपूर्ण देश कोरोनाच्या संसर्गाशी झुंजत असतानाच दुसरीकडे म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या आजाराच्या रूपात नवं संकट उभं राहिलं आहे. कोरोनासोबतच म्युकरमायकोसिसचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. (This is how mucormycosis attacks the body, these are the causes of infection; Important information provided by Dr. Randeep Guleria)
डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, म्युकरमायकोसिस हा चेहरा, संक्रमित नाक, डोळे आणि मेंदूला बाधित करू शकतो. त्यामुळे दृष्टी जाण्याचीही भीती असते. त्याबरोबरच म्युकरमायकोसिसचा संसर्ग हा फुप्फुसांपर्यंतही पोहोचू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
This disease (Mucormycosis) can affect the face, infecting nose, orbit of eye, or brain, which can cause even vision loss. It can also spread to the lung: AIIMS Director Randeep Guleria pic.twitter.com/ErNaKrmnrH
— ANI (@ANI) May 15, 2021
उपचारांमध्ये स्टेरॉईडचा वापर हे म्युकरमायकोसिसच्या संसर्गाचे मुख्य कारण आहे. ज्याप्रकारे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ते पाहता रुग्णालयांमध्ये संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रोटोकॉलचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संसर्गानंतर होत असलेले फंगल आणि बॅक्टेरियल संसर्ग मृत्यूचे कारण ठरत आहेत.
Misuse of steroids is a major cause behind this infection (Mucormycosis). Chances of fungal infection increase in the patients who are diabetic, COVID positive & are taking steroids. To prevent it, we should stop the misuse of steroids: AIIMS Director Randeep Guleria pic.twitter.com/eCegiKET1x
— ANI (@ANI) May 15, 2021
एम्सच्या संचालकांनी सांगितले की, म्युकरमायकोसिस बीजाणू माती, हवा आणि भोजनामध्येही दिसून येतात. मात्र ते कमी विषाणूजन्य असतात आणि संसर्गाचे कारण ठरत नाहीत. कोरोनाच्या संसर्गास सुरुवात होण्यापूर्वी अशाप्रकारच्या संसर्गाचे कमी रुग्ण सापडत असत. मात्र आता कोरोनामुळे म्युकरमायकोसिसचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.
सध्या एम्समध्ये अशाप्रकारच्या बुरशीजन्य संसर्गाच्या २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील २० जण अद्यापही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर ३ जण कोरोना निगेटिव्ह आहेत. अनेक राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे ५०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत.
गुलेरिया यांनी सांगितले की, स्टेरॉईडचा चुकीचा वापर हे या संसर्गाचे प्रमुख कारण आहे. डायबिटिस, कोरोना पॉझिटिव्ह आणि स्टेरॉईड घेणाऱ्या रुग्णांमध्ये या बुरशीजन्य संसर्गाची शक्यता अधिक असते. त्याला रोखण्यासाठी आपण स्टेरॉईडचा दुरुपयोग थांबवला पाहिजे.