"मुगल-ए-आझम मी पाहिलेला पहिला अन् शेवटचा चित्रपट"; राज्यपाल कोश्यारी यांची दिलीप कुमारांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 01:29 PM2021-07-07T13:29:16+5:302021-07-07T13:35:07+5:30

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातूनही शोक व्यक्त केला जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 

Mughal E Azam the only film i saw governor Bhagat Singh Koshyari pays Tributes to Dilip Kumar | "मुगल-ए-आझम मी पाहिलेला पहिला अन् शेवटचा चित्रपट"; राज्यपाल कोश्यारी यांची दिलीप कुमारांना श्रद्धांजली

"मुगल-ए-आझम मी पाहिलेला पहिला अन् शेवटचा चित्रपट"; राज्यपाल कोश्यारी यांची दिलीप कुमारांना श्रद्धांजली

googlenewsNext

मुंबई - बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार (Tragedy King DilipKumar) यांचे आज सकाळ्या सुमारास निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांना खारच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने चाहत्यांत शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातूनही शोक व्यक्त केला जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. (Mughal E Azam the only film i saw governor Bhagat Singh Koshyari pays Tributes to Dilip Kumar)

कोश्यारी म्हणाले, "दिलीप कुमार हे भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार होते. चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळातील ते नायक होते. दिलीप कुमार यांचा 'मुगल-ए-आझम' चित्रपट मला एवढा आवडला की मी तो लगोलग दोन वेळा पहिला. परंतु त्यानंतर चित्रपट पाहणे झाले नाही आणि 'मुगल-ए-आझम' मी पाहिलेला पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला."

"भारतीय चित्रपट सृष्टी आज जगात सर्वाधिक लोकप्रिय आहे. या यशाचे शिल्पकार जसे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, गीतकार, संगीतकार आणि गायक आहे, त्याच प्रमाणे दिलीप कुमार यांच्यासारखे सशक्त अभिनेतेही होते. दिलीप कुमार हे एक दंतकथा झाले होते. त्यांची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. माझ्याकरिता ते महानायक होते. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या शोकसंवेदना त्यांच्या पत्नी सायरा बानो आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांना कळवतो," असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
 

Web Title: Mughal E Azam the only film i saw governor Bhagat Singh Koshyari pays Tributes to Dilip Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.