मुजावरपुरा येथे वन विभागाचा छापा तीन लाखांचा माल जप्त पातुरातील फर्निचरची दुकाने बंद ही कारवाई सुरू करताच शहरातील फर्निचरची तब्बल २५ दुकाने दुकानदारांनी
By admin | Published: February 19, 2016 12:40 AM2016-02-19T00:40:50+5:302016-02-19T00:40:50+5:30
पातूर: शहरातील मुजावरपुरा येथे मोठ्या प्रमाणात चोरीच्या सागवानाची साठवणूक होत असल्याच्या प्राप्त गुप्त माहितीवरून पातूर पोलीस, महसूल व वन विभाग यांच्या संयुक्त पथकाने तेथे १८ फेब्रुवारीच्या सकाळी ११ वाजताच्या सुमारास छापा मारून तीन लाखांचा माल जप्त केला. या ठिकाणाहून आरोपी पसार होण्यात यशस्वी ठरले.
Next
प तूर: शहरातील मुजावरपुरा येथे मोठ्या प्रमाणात चोरीच्या सागवानाची साठवणूक होत असल्याच्या प्राप्त गुप्त माहितीवरून पातूर पोलीस, महसूल व वन विभाग यांच्या संयुक्त पथकाने तेथे १८ फेब्रुवारीच्या सकाळी ११ वाजताच्या सुमारास छापा मारून तीन लाखांचा माल जप्त केला. या ठिकाणाहून आरोपी पसार होण्यात यशस्वी ठरले. पातूर वनपरिक्षेत्रात मागील काही दिवसांपासून अनेक सागवान वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे व सागवान लाकूड चोरीस जात असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले होते. वनकर्मचारी या सावगान लाकूडचोरांच्या मागावर होते. मुजावरपुरा येथे सागवानाचा माल आणण्यात आल्याची माहिती मिळाल्यावरून गुरुवारी सकाळी ११ वाजता उपवनसंरक्षक लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलीस व महसूल विभागाच्या सहकार्याने छापा टाकण्यात आला. सहायक वनसंरक्षक नाईकवाडे यांच्या नेतृत्वात पातूर, मालेगाव, अकोला, बार्शीटाकळी व आलेगाव परिक्षेत्रातील वनाधिकारी व कर्मचार्यांनी तसेच अकोल्याचे संरक्षक गोंडाणे व मंगरुळपीर येथील गिरिता देसाई यांनी कारवाईत भाग घेतला. या कारवाईत मुजावरपुरा येथील ८ ते १० घरांमधून चोरीच्या सागवानाच्या लाकडापासून तयार केेलेले फर्निचर, दरवाजासाठी लागणारे कटसाईज लाकूड, लाकूड कापण्यासाठी वापरण्यात येणारा रंधा, आरामशीन आदी साहित्यदेखील जप्त करण्यात आले. या मालाची किंमत तीन लाख रुपये आहे. या कारवाईत शे. खलील शे. दाऊद, शे. तालेब शे. अब्बास, सय्यद युसूफ सय्यद याकूब, सै. मुस्ताक सै. चांद, सै. इम्रान सै. वाहेद, शे. आरिफ शे. नबी यांच्यासह तब्बल १० संशयितांना अज्ञात आरोपी करण्यात आले. हे वृत्त लिहिपर्यंत आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते वा कुणालाही अटक करण्यात आली नव्हती.(वार्ताहर)