मुकेश अंबानी यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; मुलगा अनंतच्या लग्नाचे दिले निमंत्रण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 03:22 PM2024-07-04T15:22:16+5:302024-07-04T15:22:33+5:30

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट येत्या 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.

Mukesh Ambani met Sonia Gandhi for Inviting her for Anant ambani's wedding | मुकेश अंबानी यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; मुलगा अनंतच्या लग्नाचे दिले निमंत्रण...

मुकेश अंबानी यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; मुलगा अनंतच्या लग्नाचे दिले निमंत्रण...

Anant and Radhika Marriage : रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी गुरुवारी(दि.4) काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी अंबानी यांनी सोनिया गांधींना मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट येत्या 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. या शाही सोहळ्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरू आहे. 

अंबानी कुटुंबाच्या मुंबईतील घरात नुकतीच मामेरू(गुजराती प्रथा) प्रथा पार पडली. विशेष म्हणजे, मुकेश आणि नीता अंबानी मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी स्वतः जात आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक राजकीय नेते, बॉलिवूड सेलिब्रिटींसह उद्योग क्षेत्रातील दिग्गजांच्या घरी जाऊन मुलाच्या लग्नाचे निमंत्रण दिले आहे.

गेल्या महिन्यात नीता अंबानी यांनी वाराणसीत बाबा विश्वनाथाच्या मंदिरात मुलाच्या लग्नाची पत्रिका ठेवली आणि मंदिरात 1.51 कोटींचे दानही दिले. तर, त्यापूर्वी त्यांनी माता अन्नपूर्णा देवीच्या मंदिरालाही 1 कोटी रुपयांचे दान दिले. दरम्यान, अनंत आणि राधिका यांचे लग्न 12-14 जुलैदरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये होणार आहे.

जामनगरमध्ये प्री-वेडिंग सेलिब्रेशन
यापूर्वी मार्च महिन्यात अनंत आणि राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा गुजरातच्या जामनगरमध्ये पार पडला होता. त्या सोहळ्यात देशासह जगभरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. तर, त्यानंतर, यूरोपमध्ये दुसरा प्री-वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या सोहळ्यातदेखील अनेक सेलिब्रिटी हजर होते.
 

Web Title: Mukesh Ambani met Sonia Gandhi for Inviting her for Anant ambani's wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.