मुक्ताबाई राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान उत्साह : टाळ-मृदुंगाचा गजर व मुक्ताबाई, श्रीरामाच्या जयघोषाने परिसर दणाणला
By admin | Published: June 19, 2016 12:15 AM2016-06-19T00:15:10+5:302016-06-19T00:15:10+5:30
जळगाव : जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) संचलित श्री संत मुक्ताबाई राम पालखीचे शनिवारी संध्याकाळी टाळ-मृदुंगाचा गजर व मुक्ताबाई, श्रीरामाच्या जयघोषात मंदिर संस्थानपासून प्रस्थान झाले. रात्री श्री संत अप्पा महाराज समाधी मंदिर येथे मुक्काम होऊन १९ रोजी सकाळी ८ वाजता पंढरपूर येथे आषाढी यात्रेकरिता प्रस्थान होणार आहे.
Next
ज गाव : जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) संचलित श्री संत मुक्ताबाई राम पालखीचे शनिवारी संध्याकाळी टाळ-मृदुंगाचा गजर व मुक्ताबाई, श्रीरामाच्या जयघोषात मंदिर संस्थानपासून प्रस्थान झाले. रात्री श्री संत अप्पा महाराज समाधी मंदिर येथे मुक्काम होऊन १९ रोजी सकाळी ८ वाजता पंढरपूर येथे आषाढी यात्रेकरिता प्रस्थान होणार आहे. अप्पा महाराजांचे वंशज व विद्यमान गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज बाळकृष्ण महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या पालखीचे हे १४४ वे वर्ष आहे. मंदिर संस्थानपासून पालखी प्रस्थान होण्यापूर्वी मुंबई येथील चित्रकार शिवराज बांदर यांच्यासह कुमारीकांच्याहस्ते मुक्ताबाईच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. संत मुक्ताबाईने अप्पा महाराजांना जो दृष्टांत दिला त्याचे बांदर यांनी चित्र काढले असून त्याचे या वेळी भाविकांना दर्शन देण्यात आले. त्यानंतर पादुका पालखीत ठेवून पालखीचे प्रस्थान झाले. या वेळी भगवे ध्वज हाती घेतलेल्या व टाळ-मृदुंगाचा गजर करीत निघालेले भाविक लक्ष वेधून घेत होते. आदिशक्ती मुक्ताबाई की जय, भगवान श्रीराम, अप्पा महाराज यांच्या जयघोषासह जय जय रघुवीर समर्थ अशा जयजयकाराने पालखी मार्ग दणाणला होता.पालखी श्रीराम मंदिर संस्थान येथून निघून भोईटे गढी, कोल्हेवाडा, तळेले वाडा, श्री सद्गुरू बाबजी महाराज समाधी मंदिर, गोपाळपुरा, श्री विठ्ठल मंदिर, बाहेरपुरा, तरुण कुढापा चौक, पंतनगर मार्गे श्री सद्गुरू अप्पा महाराज समाधी मंदिर येथे पोहचली. तेथे रात्री भजन, आरती झाली होऊन तेथे पालखीचा मुक्काम झाला. १९ रोजी पहाटे ५ वाजता प्रभू श्रीरामांच्या मूर्तीस पूजाभिषेक, श्री संत मुक्ताबाई यांच्या पादुकांना, श्री अप्पा महाराज, वासुदेव महाराज, केशव महाराज समाधी स्थान व बाळकृष्ण महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून पालखीचे प्रस्थान होईल. पालखीस शुभेच्छासाठी आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रयाग कोळी आदी उपस्थित राहतील. पालखी जिल्हा रुग्णालय रस्ता, संत कंवरराम चौक, पंचमुखी हनुमान मंदिर, बाबा हरदासराम चौक, इच्छादेवी चौक, जुना शिरसोली नाका, शिवाजी उद्यान मार्गे मेहरुण जवळील शिवाजी उद्यान येथील श्री संत मुक्ताबाई पादुका मंदिर येथे पोहोचेल. तेथे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते श्रीसंत मुक्ताबाई पादुका मंदिरात पादुकांचे पूजन होऊन पालखी पुढील प्रवासाला निघेल.