Mukul Rohatgi : मुकुल रोहतगी पुन्हा होऊ शकतात भारताचे अ‍ॅटर्नी जनरल; 91 वर्षीय केके वेणुगोपाल होणार रिटायर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 12:34 PM2022-09-13T12:34:16+5:302022-09-13T12:41:39+5:30

Mukul Rohatgi to Become Attorney General : मुकुल रोहतगी हे 2014 ते 2017 या काळात देशाचे अ‍ॅटर्नी जनरल होते.

mukul rohatgi to become attorney general of india again venugopal 91 to retire | Mukul Rohatgi : मुकुल रोहतगी पुन्हा होऊ शकतात भारताचे अ‍ॅटर्नी जनरल; 91 वर्षीय केके वेणुगोपाल होणार रिटायर 

Mukul Rohatgi : मुकुल रोहतगी पुन्हा होऊ शकतात भारताचे अ‍ॅटर्नी जनरल; 91 वर्षीय केके वेणुगोपाल होणार रिटायर 

googlenewsNext

नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) पुन्हा एकदा भारताचे अ‍ॅटर्नी जनरल (Attorney General of India) होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, मुकुल रोहतगी हे 2014 ते 2017 या काळात देशाचे अ‍ॅटर्नी जनरल होते. सध्याचे अ‍ॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल (KK Venugopal) यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपत आहे. 

91 वर्षीय केके वेणुगोपाल आता या पदावर राहण्यास इच्छुक नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, सूत्रांच्या हवाल्याने मुकुल रोहतगी यांच्याबाबतची ही माहिती समोर येत आहे. मुकुल रोहतगी यांच्या नियुक्तीची अधिकृत अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही. 2020 मध्ये केके वेणुगोपाल यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपले वय लक्षात घेऊन अ‍ॅटर्नी जनरल पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती सरकारला केली होती. पण, सरकारने केके वेणुगोपाल यांना पुढील कार्यकाळासाठी काम करण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी आणखी दोन वर्षे या पदावर राहण्याचे मान्य केले होते.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुकुल रोहतगी 1 ऑक्टोबरपासून अ‍ॅटर्नी जनरल म्हणून दुसरा कार्यकाळ सुरू करतील, अशी शक्यता आहे. मुकुल रोहतगी यांनी  भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम केले आहे. 2017 मध्ये मुकुल रोहतगी यांच्या राजीनाम्यानंतरही सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यासह संवेदनशील मुद्द्यांवर त्यांच्याशी सल्लामसलत केली होती.

मुकुल रोहतगी यांनी लढवले आहेत महत्त्वाचे खटले
2014 मध्ये भाजप मोठ्या जनादेशाने सत्तेवर आल्यावर मुकुल रोहतगी यांची पहिल्या कार्यकाळासाठी अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुकुल रोहतगी हे भारतातील सर्वात प्रसिद्ध वकिलांपैकी एक आहेत. त्यांनी गुजरात दंगलीसह अनेक महत्त्वाचे खटले लढवले आहेत. मुकुल रोहतगी हे गुजरात दंगलीप्रकरणी गुजरात सरकारचे वकील होते. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाशी संबंधित खटलाही त्यांनी लढवला. अलीकडेच मुकुल रोहतगी यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या वकिलांचे नेतृत्व केले होते. आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती.

Web Title: mukul rohatgi to become attorney general of india again venugopal 91 to retire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.