मुकूल रॉय यांची घर वापसी; ममता म्हणाल्या- आपल्या लोकांचं स्वागत, विश्वासघात करणाऱ्यांना स्थान नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 06:19 PM2021-06-11T18:19:07+5:302021-06-11T18:20:17+5:30

भजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी शुक्रवारी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रेवेश केला. मुकूल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालयात जाऊन पक्षाचे सदस्यत्व घेतले.

Mukul roy joining tmc in presence of west bengal cm mamata banerjee in kolkata | मुकूल रॉय यांची घर वापसी; ममता म्हणाल्या- आपल्या लोकांचं स्वागत, विश्वासघात करणाऱ्यांना स्थान नाही

मुकूल रॉय यांची घर वापसी; ममता म्हणाल्या- आपल्या लोकांचं स्वागत, विश्वासघात करणाऱ्यांना स्थान नाही

Next

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या तृणमूल काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. आज भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय (Mukul roy) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये घर वापसी केली. मुकूल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ममता म्हणाल्या मुकूल आपल्या घरचेच सदस्य आहेत. ते आपल्या घरी परतले आहेत. त्यांचे अभिनंदन करते. (Mukul roy joining tmc in presence of west bengal cm mamata banerjee in kolkata)

भजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी शुक्रवारी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रेवेश केला. मुकूल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालयात जाऊन पक्षाचे सदस्यत्व घेतले. यावेळी ममता म्हणाल्या, मुकूल आपल्याच घरातील सदस्य आहेत. ते आपल्या घरी परत आले. मी त्यांचे अभिनंदन करते. निवडणुकीदरम्यान मुकूल यांनी आपल्यासोबत विश्वासघात केली नाही. ज्या लोकांनी विश्वासघात केली, त्यांना आम्ही पक्षात घेणार नाही. याच वेळी मुकूल रॉय यांना महत्वाची भूमिका दिली जाईल, असेही ममता म्हणाल्या.

तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालय आयोजित पत्रकार परिषदेत मुकुल रॉय म्हणाले, 'टीएमसीत परतल्याने मला फार बरे वाटत आहे. भाजपतून बाहेर पडल्याने आणि आपल्या लोकांना भेटून फार चांगले वात आहे. मी भाजपत काम करू शकलो नाही. यामुळे आपल्या  जुन्या घरी परत आलो. रॉय म्हणाले, मी भाजप सोडून TMC त आलो आहे, आता बंगालमध्ये जी स्थिती आहे, त्या स्थितीत भाजपत कुणीही राहणार नाही. मुकूल यांच्या मुलानेही भाजपत प्रवेश केला आहे. मुकुल रॉय हे सर्वात पहिले टीएमसी सोडणाऱ्या नेत्यांपैकी एक होते ते 2017 मध्ये भाजपत गेले होते.

पराभूत झाल्याने पश्चिम बंगाल भाजपमध्ये संघर्ष -
विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने पश्चिम बंगाल भाजपमध्ये संघर्ष सुरू आहे. बंगाल भाजपच्या एक उपाध्यक्षाचे म्हणणे आहे, की हीच परिस्थिती राहिली, तर त्यांना सर्वांनाच घरी बसावे लागेल. भाजपच्या एका महिला आमदाराचे म्हणणे आहे, की पराभवानंतर स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. आमचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेच आम्हाला सोडून जात आहेत. भाजपतील जुने लोकही सुवेंदू अधिकारी आणि तृणमूलमधून आलेल्या लोकांमुळे नाराज आहेत. पुढे काय होईल कुणास ठाऊक? अशातच मुकूल रॉय पक्ष सोडून गेल्याने पश्चिम बंगाल भाजपमध्ये सर्व काही ठीक नाही, हे स्पष्ट झाले आहे.


 

Web Title: Mukul roy joining tmc in presence of west bengal cm mamata banerjee in kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.