मुलायम सिंह-पंतप्रधान मोदींच्या "कान की बात"चा अखिलेश यांनी केला खुलासा

By admin | Published: May 5, 2017 08:47 PM2017-05-05T20:47:19+5:302017-05-05T21:06:56+5:30

योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानात काय पुटपुटले याचं उत्तर आजही अनुत्तरितच आहे.

Mulayam Singh-Akhilesh's remarks about Prime Minister Modi's "ears" | मुलायम सिंह-पंतप्रधान मोदींच्या "कान की बात"चा अखिलेश यांनी केला खुलासा

मुलायम सिंह-पंतप्रधान मोदींच्या "कान की बात"चा अखिलेश यांनी केला खुलासा

Next

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. 5 - कटप्पाने बाहुबलीला का मारले? याचं उत्तर आता सर्वांनाच मिळाले आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानात काय पुटपुटले? याचं उत्तर आजही अनुत्तरितच आहे. 
 
आजही या प्रश्नाचं उत्तर कुणी-न्-कुणी तरी शोधताना दिसत आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी गंमतीशीर अंदाजात याचे उत्तर दिले. 
 
यावेळी अखिलेश यादव म्हणाले की, "मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला खरं वाटणार नाही. नेताजींनी पंतप्रधानांच्या कानात म्हटलं होतं की...मोदीजी जरा सांभाळून हा माझा मुलगा आहे. तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ मला जे वाटले ते मी सांगितले", असं उत्तर दिल्यानंतर अखिलेश स्वतःदेखील हसू लागले. 
 
 
तर दुसरीकडे, एका टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमात अखिलेश यादव यांनी सपाचा पराभव भाजपाच्या खोटारडेपणामुळे झाल्याचे सांगितले होते. भाजपाने लोकांना फसवलं आहे, असाही दावा त्यांनी केला होता. तर राहुल गांधींसोबतची मंत्री दीर्घकाळ राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.  
 
तर अखिलेश यादव   मायावती यांच्यासोबत युती करण्यासाठी तयार आहेत का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, काही जण ही युती होऊ देणार नाहीत. त्यामुळे अखिलेश यादव आणि मायावती यांची युती होऊ न देणार ते काही जण कोण आहेत? हा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
 
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव या दोघांमध्ये झालेली गळाभेट आणि "कान की बात"चा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. यावेळी मुलायम सिंह यादव पंतप्रधान मोदींच्या कानात नेमके काय पुटपुटले असावे,  याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. त्याचा खुलासा काही दिवसांपूर्वी  द टेलिग्राफ" या इंग्रजी वृत्तपत्राने केला होता.  
 
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला मुलायम सिंग पंतप्रधानांच्या कानात काही तरी पुटपुटत असल्याचे दिसले व मोदींनीही मान हलवून त्यांच्या म्हणण्यास होकार दर्शवला. नंतर मोदी बाजूला उभ्या असलेल्या अखिलेश यादव यांच्याकडे वळले व त्यांनी अखिलेशच्या पाठीवर हलकीशी थापही मारली.
 
"द टेलिग्राफ"ने दिलेल्या बातमीनुसार, मुलायम सिंह यादव यांनी पंतप्रधानांना मुलगा अखिलेश यादव यांची काळजी घ्यायले सांगितले. ‘थोडा अखिलेश का खयाल रखिये… और इनको सिखाईये…’ असे मुलायम मोदींच्या कानात बोलल्याची माहिती मिळाली होती.
भाजपाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सपा-काँग्रेस आघाडीचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला व सरकारही स्थापन केलं. दरम्यान, उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत केलेली युती मुलायम सिंह यादव यांना कधीही पटली नव्हती. यावर त्यांनी अनेकदा नाराजीही व्यक्त केली. यावरुनच यादव यांनी मोदींना मुलगा अखिलेश यांची काळजी घ्यायला सांगून याद्वारे मुलाप्रती असलेले प्रेम व काळजीही व्यक्त केल्याचे बोलले जात होते.   
 
मोदी-मुलायम यांची गळाभेट; गुजगोष्टी
लखनऊच्या कांशीराम स्मृती उपवन मैदानावर उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांच्या सहकारी मंत्रिमंडळाचा तासभर चाललेल्या शपथविधी सोहळ्यात  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची झालेली गळाभेट हे मोठे आकर्षण ठरले होते.
 
सर्व मंत्र्यांच्या शपथविधी पार पडल्यावर पंतप्रधान मोदी उठून तेथून बाहेर निघणार तेवढ्यात मुलायम सिंह यांनी त्यांना थांबवले व मोदीही थांबले. दोघांनी परस्परांना आलिंगन दिले. एवढेच नव्हे तर मुलायम सिंह पंतप्रधानांच्या कानात काही तरी पुटपुटत असल्याचे दिसले व मोदींनीही मान हलवून त्यांच्या म्हणण्यास होकार दिल्याचे दिसले. नंतर मोदी बाजूला उभ्या असलेल्या अखिलेश यादव यांच्याकडे वळले व त्यांनी अखिलेशच्या पाठीवर हलकीशी थापही मारली. 
 

Web Title: Mulayam Singh-Akhilesh's remarks about Prime Minister Modi's "ears"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.