मुलायम सिंहांनी युपी अध्यक्षपदावरून अखिलेश यादवांना हटवलं, शिवपाल यादव नवे प्रमूख

By admin | Published: September 13, 2016 10:42 PM2016-09-13T22:42:08+5:302016-09-13T22:42:08+5:30

माजवादी पक्षातील अंतर्गत कलह आता उफाळून आला आहे. मुलायम सिंह यादव यांनी अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशच्या अध्यक्षपदावरून हटवलं आहे

Mulayam Singh removed Akhilesh Yadav as UP president, Shivpal Yadav new chief | मुलायम सिंहांनी युपी अध्यक्षपदावरून अखिलेश यादवांना हटवलं, शिवपाल यादव नवे प्रमूख

मुलायम सिंहांनी युपी अध्यक्षपदावरून अखिलेश यादवांना हटवलं, शिवपाल यादव नवे प्रमूख

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.13- समाजवादी पक्षातील अंतर्गत कलह आता उफाळून आला आहे. मुलायम सिंह यादव यांनी अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशच्या अध्यक्षपदावरून हटवलं आहे. त्यांच्याजागी शिवपाल यादव यांची निवड करण्यात आली आहे.
 
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी दोन मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती.  भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खाणमंत्री गायत्री प्रसाद प्रजापती आणि राजकिशोर सिंह यांना हटवण्यात आलं होतं.  हटवण्यात आलेले हे दोन्ही मंत्री मुलायम सिंह यांच्या जवळचे मानले जातात.
 
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना अखिलेश यादवांना अध्यक्षपदावरून हटवून मुलायम यादवांनी  पक्षाचा खरा बॉस कोण आहे हेच दाखवून दिल्याची चर्चा आहे.  

Web Title: Mulayam Singh removed Akhilesh Yadav as UP president, Shivpal Yadav new chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.