मुलायमसिंह यादव आयसीयूमध्ये; बुधवारी रात्री तब्येत बिघडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 22:09 IST2020-05-07T22:07:31+5:302020-05-07T22:09:33+5:30
बुधवारी रात्रीपासून मुलायमसिंहांच्या पोटात दुखत होते. यामुळे त्यांना मेदांताच्या आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे.

मुलायमसिंह यादव आयसीयूमध्ये; बुधवारी रात्री तब्येत बिघडली
उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लखनऊच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना पोट दुखीमुळे कोलोनोस्कोपी करण्यात आल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले.
बुधवारी रात्रीपासून मुलायमसिंहांच्या पोटात दुखत होते. यामुळे त्यांना मेदांताच्या आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव, भाऊ शिवपाल यादव हजर आहेत. गुरुवारी दुपारी अखिलेश यादवही पोहोचले असून मुलायमसिंहांच्या प्रकृतीची विचारणा केली.
डॉक्टरांनुसार मुलायमसिंहांची तब्येत ठीक असून रात्री त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. बुधवारी रात्रीपासून त्यांची तब्येत बिघडल्याने भरती करण्यात आले होते.
दरम्यान, मुलायमसिंहांना यापूर्वीही अनेकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या...
लॉकडाऊनमध्ये मद्यसाठ्यात तफावत; भाजपा आमदार पत्नीच्या दुकानाचा परवाना रद्द
अख्खा देश कोरोनाच्या धास्तीने घरात असताना परदेशी पर्यटकांकडून किनाऱ्यावर मौजमजा
SBI कडून लॉकडाऊनमध्ये मोठा दिलासा; कर्जाच्या व्याजदरात कपात
पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडणार?; भारतीय हवामान विभागाचा इशारा
रहस्यमय...! भारतातील शेवटचे गाव; जिथे आजही महाभारतातील पूल अस्तित्वात