मुलायम सिंह अचानक 'सपा'च्या कार्यालयात पोहोचले अन् अखिलेश यांना दिला मोलाचा सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 08:48 PM2022-03-13T20:48:44+5:302022-03-13T20:49:15+5:30
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने विजय मिळवला नसला तरी सपा हा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने विजय मिळवला नसला तरी सपा हा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे. 'सपा'चे पर्यवेक्षक मुलायम सिंह यादव यांनी आज सपा कार्यालयात पोहोचून त्यांचा सुपुत्र आणि पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना आशीर्वाद दिला. अखिलेश यादव यांना पाहताच वडील मुलायम सिंह यादव यांनी त्यांचे कौतुक केले. "अखिलेश खूप छान लढलास, खूप अभिनंदन", अशी कौतुकाची थाप मुलायम सिंह यांनी अखिलेश यांना दिली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुलायम सिंह यादव पहिल्यांदाच पक्ष कार्यालयात पोहोचले होते.
मुलायम सिंह सपा कार्यालयात पोहोचताच उपस्थित लोकांनी त्यांचे आशीर्वाद घेतला. दुसरीकडे मुलायमसिंह यादव यांची तीच जुनी शैली पुन्हा एकदा पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी उपस्थितांचे स्वागत स्वीकारून त्यांच्याशी संवाद साधला. मुलायम यांच्या उपस्थितीमुळे कार्यालयात उपस्थित लोकांचे चेहरे आनंदाने फुलले होते. यानंतर मुलगा अखिलेश यादव यांनी वडिलांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. मुलाचे कौतुक करताना ते म्हणाले की, "अखिलेश तू खूप चांगला लढलास, तुझे खूप खूप अभिनंदन"
नेताजींनी मुलाला आशीर्वाद दिला
यूपीमध्ये समाजवादी पक्षाने 125 जागा जिंकल्या आहेत, तरीही पक्ष बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिला आहे. मात्र पक्षाची कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. यामुळेच मुलायमसिंह यादव आपल्या मुलाचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी अखिलेशला प्रोत्साहन देत तुम्ही खूप छान लढलात असे सांगितले. यूपी विधानसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांच्या पक्ष सपाने जयंत चौधरी यांच्या आरएलडी आणि सुहेलदेव समाज पक्षासोबत युती केली होती, परंतु त्यानंतरही ते बहुमताचा आकडा गाठू शकले नाहीत.
गाझीपूरमधील सर्व जागा सपाने काबीज केल्या
गाझीपूरच्या सर्व जागांवर सपाने दणदणीत विजय नोंदवला आहे. येथे भाजपाला खातेही उघडता आले नाही. योगी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या संगीता बळवंत यांनाही आपली जागा वाचवता आली नाही. योगी लाट असूनही सपाने येथील सर्व जागांवर दणदणीत विजय नोंदवला आहे. गाझीपूर सदर जागेवर एकही उमेदवार पुन्हा जिंकू शकला नसल्याचे सांगण्यात येत आहे. योगी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या संगीता बळवंत यांचा सपाच्या जयकिशन साहू यांच्याकडून पराभव झाला. गाझीपूरची सर्व सभा सपाने ताब्यात घेतल्या आहेत. 2017 च्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत सपाची कामगिरी चांगली झाली आहे.