'सायकल'साठी मुलायम सिंग यादवांची निवडणूक आयोगकडे धाव

By admin | Published: January 9, 2017 03:01 PM2017-01-09T15:01:27+5:302017-01-09T15:02:35+5:30

समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादवांनी आगामी निवडणुकीत सायकलचं चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली

Mulayam Singh Yadav's election for 'bicycle' was run by the Election Commission | 'सायकल'साठी मुलायम सिंग यादवांची निवडणूक आयोगकडे धाव

'सायकल'साठी मुलायम सिंग यादवांची निवडणूक आयोगकडे धाव

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादवांनी आगामी निवडणुकीत सायकलचं चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी बातचीत केली आहे. 

यावेळी ते म्हणाले, मी आणि माझ्या मुलामध्ये कोणताही वाद नाही. मात्र समाजवादी पार्टीत नक्कीच वाद आहेत. या सर्व प्रकरणामागे एक व्यक्ती आहे. मात्र हे मतभेदही लवकरच दूर होतीत, सायकल हे निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचं याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. आम्ही निवडणूक आयोगाच्या उत्तराची वाट पाहत आहोत.
 
दरम्यान, रामगोपाल यादव आणि नरेश अग्रवाल यांनीही केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. अखिलेशकडून त्यांनी पार्टी चिन्हावर दावा ठोकला आहे. त्यांनी खासदार, आमदारांसह पार्टीच्या महत्त्वाच्या पदाधिका-यांचं एक एफिडेव्हिट निवडणूक आयोगाकडे दाखल केले आहे. रामगोपाल यादव म्हणाले, अखिलेश समर्थकच खरी समाजवादी पार्टी आहेत. त्यामुळे पार्टीचं चिन्ह अखिलेशला मिळालं पाहिजे. 
 

Web Title: Mulayam Singh Yadav's election for 'bicycle' was run by the Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.