२८ वर्षांनंतर मुंबई - आग्रा विमानसेवा; दीर्घकाळापासून सुरू होती मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 06:29 AM2021-03-14T06:29:44+5:302021-03-14T06:30:25+5:30
आता २९ मार्चपासून ही सेवा इंडिगो आठवड्यातून तीन दिवस सुरू करणार आहे. तथापि, २८ मार्चपासून आग्रा - भोपाळ आणि आग्रा - बंगलोर विमानसेवाही अगोदरच प्रस्तावित आहे.
मुंबई: २८ वर्षांनंतर मुंबई ते आग्रा विमानप्रवास पुन्हा एकदा सुरू होत आहे. मागील वेळी ही सेवा मोदीलुफ्त एअरलाइनने सुरू केली होती. मोदीलुफ्त ही फर्स्ट, बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासची देशांतर्गत सेवा देणारी देशातील एकमेव कंपनी होती. दरम्यान, आता २९ मार्चपासून ही सेवा इंडिगो आठवड्यातून तीन दिवस सुरू करणार आहे. तथापि, २८ मार्चपासून आग्रा - भोपाळ आणि आग्रा - बंगलोर विमानसेवाही अगोदरच प्रस्तावित आहे. (Mumbai - Agra Airlines after 28 years; Demand was long overdue)
आग्रा - मुंबई विमानसेवेसाठी दीर्घकाळापासून मागणी होत होती. ही सेवा आता दर आठवड्याला सोमवार, बुधवार आणि शनिवारी असणार आहे. आग्रा-मुंबई विमानप्रवास पर्यटन आणि व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने कॉर्पोरेटच्या अनेक बैठका आता मुंबईत होऊ शकतील. थेट विमानसेवा नसल्याने या बैठका सध्या दिल्लीत होत आहेत.