आजपासून धावणार मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस, पाहा वेळापत्रक आणि तिकीट दर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 07:03 AM2022-09-30T07:03:32+5:302022-09-30T07:04:09+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन.

Mumbai Ahmedabad Vande Bharat superfast Express to run from today check schedule ticket price pm narendra modi | आजपासून धावणार मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस, पाहा वेळापत्रक आणि तिकीट दर

आजपासून धावणार मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस, पाहा वेळापत्रक आणि तिकीट दर

Next

मुंबई : बहुप्रतीक्षित आणि नव्याने बनवलेली सेमी-हाय स्पीड ट्रेन अर्थात वंदे भारत एक्स्प्रेस आज, ३० सप्टेंबरपासून धावणार आहे. मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसचे  उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या ट्रेनची नियमित सेवा १ ऑक्टोबर २०२२ पासून मुंबई सेंट्रल येथून सुरू होणार आहे. 

वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहेत. ही पूर्णपणे एसी असणार आहे. त्यासोबतच स्लाइडिंग दरवाजे, व्यक्तिगत वाचनासाठी दिवा, मोबाइल चार्जिंग पॉइंट, अटेंडेंट कॉल बटन, बायो-टॉयलेट, स्वंचलित  द्वार, सीसीटीव्ही कॅमेरे, रिक्लाइनिंग सुविधा, आरामदायक सीट असणार आहेत.  नुकतीच रेल्वे मंत्रालयाने मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान ही गाडी रविवार सोडून दररोज धावणार आहे. पंतप्रधान मोदी शुक्रवारी  सकाळी १०. ३० वाजता गांधीनगर येथून वंदे भारतच्या पहिल्या फेरीला हिरवा झेंडा दाखवणार आहे. प्रवाशांसाठी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस  अहमदाबाद  स्थानकावरून सकाळी १४. ०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १९.३५ वाजता पोहोचेल.

वेळापत्रक
मुंबई सेंट्रल येथून सकाळी ६.२० वाजता सुटेल आणि दुपारी १२.३० वाजता गांधीनगरला पोहोचेल.  गांधीनगर येथून दुपारी १४.०५ वाजता सुटेल रात्री १९.३५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.  सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी ही गाडी धावणार आहे.

तिकीट दर 
 चेअर कार तात्पुरते भाडे (केटरिंग शुल्क वगळून) मुंबई सेंट्रल ते सुरत- ६९० रुपये,  मुंबई सेंट्रल ते वडोदरा- ९०० रुपये,  मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद - १०६० रुपये,  मुंबई सेंट्रल ते गांधीनगर -१११५ रुपये तर एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी तात्पुरते भाडे (खानपान शुल्क वगळून) मुंबई सेंट्रल ते सुरत-१३८५ रुपये , मुंबई सेंट्रल ते वडोदरा - १८०५  रुपये ,  मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद-२१२० रुपये, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर- २२६० रुपये असणार आहे.

Web Title: Mumbai Ahmedabad Vande Bharat superfast Express to run from today check schedule ticket price pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.