मुंबई : मनपाच्या शाळा येत्या रविवारी राहणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 09:32 AM2017-08-11T09:32:16+5:302017-08-11T09:35:51+5:30
मुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या दिवशी दक्षिण मुंबईतील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्या दिवशीचं विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान भरुन काढण्यासाठी येत्या रविवारी (13 ऑगस्ट)सर्व मनपा शाळा सुरू राहणार आहेत.
मुंबई, दि. 11 - येत्या रविवारी (13 ऑगस्ट)सर्व मनपा शाळा सुरू राहणार आहेत. 9 ऑगस्टला मराठा क्रांती मोर्चामुळे दक्षिण मुंबईतील महानगरपालिका व खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. वाहतूक कोंडीत या परिसरातील शालेय विद्यार्थी अडकण्याची शक्यता असल्याने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शालेय विभागानं घेतला होता. मात्र यावेळी त्या दिवशी होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान अन्य दिवशी भरुन काढण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार मुलांचं शालेय नुकसान होऊ नये यासाठी येत्या रविवारी मनपाच्या सर्व शाळा सुरू राहणार आहेत.
9 ऑगस्टला शाळांना होता सुट्टी
मुंबईमध्ये 9 ऑगस्टला मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली होती. मोर्चामुळे शालेय वाहतुकीस यामुळे अडचण निर्माण झाल्यास विद्यार्थी वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची शक्यता आहे, असे सांगत शिक्षण विभागानं बुधवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण मुंबईतील सरकारी शाळांसहीत खासगी शाळांनाही सुट्टी देण्यात आली होती.