हातात बॅग घेऊन पंतप्रधान 'मोदी' ट्रेननं कुठे निघाले...? आपणही फसलात ना...?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 07:02 PM2021-09-15T19:02:44+5:302021-09-15T19:05:51+5:30
यापूर्वी, पंतप्रधान मोदींसारखे दिसणारे अभिनंदन पाठकही चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मुंबई- हातात ट्रॉली ब्रिफकेस घेऊन पंतप्रधान मोदी ट्रेनने कुठे निघाले आहेत? त्यांच्यासोबत ना सुरक्षा रक्षक, ना गर्दी. एकटे कुठे चालले आहेत मोदी? मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकावर मंगळवारी हे दृष्य दिसले. खरे तर, हे दृष्य पाहून अनेक लोक फसले. मात्र, त्यांनी मोदींना नाही, तर हुबेहूब त्यांच्या सारख्याच दिसणाऱ्या एका दुसऱ्याच व्यक्तीला पाहिले होते. पण ही त्यांची चूक नाही. कारण ही व्यक्ती केवळ पंतप्रधान मोदींसारखी दिसतच नाही, तर तिचे कपडे, दाढी आणि हावभावही पंतप्रधान मोदींसारखेच आहे. (Mumbai Viral News lalaji devaria resembles PM Narendra Modi waves at dadar station)
पायलट BF नं विमानातच केली अशी अनाउंसमेंट, की लाजून गर्लफ्रेंडचं झालं पाणी-पाणी
पंतप्रधान मोदींसारख्याच दिसणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे, लालाजी देवरिया ( Lalaji Devaria). अनेक वेळा लोक त्यांना पाहून फसतात. त्यांचा चेहरा तर पंतप्रधान मोदींसारखा आहेच, पण त्यांची उंची, चालणे आणि हावभावही मोदींसारखेच आहेत. वरून, कपडे आणि लांब दाढीमुळे तर ते पूर्णपणे पीएम मोदींसारखेच दिसतात.
यापूर्वी, पंतप्रधान मोदींसारखे दिसणारे अभिनंदन पाठकही चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अभिनंदन यांनी अपक्ष उमेदवार म्हणून, लखनौ आणि वाराणसीतूनही लोकसभा निवडणुकीसाठी अर्जही दाखल केले होते. अभिनंदन हे उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी आहेत.