माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पमध्ये मुंबईच्या महिलेचा मृत्यू, १५ दिवसांत ४ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 08:50 AM2023-05-20T08:50:59+5:302023-05-20T08:52:18+5:30
काठमांडू : माउंट एव्हरेस्ट जिंकण्याच्या जिद्दीने महाराष्ट्रातील मुंबईच्या एका गिर्यारोहक महिलेचा जीव घेतला. ५९ वर्षीय सुझान लिओपोल्डिना जिझस यांना ...
काठमांडू : माउंट एव्हरेस्ट जिंकण्याच्या जिद्दीने महाराष्ट्रातील मुंबईच्या एका गिर्यारोहक महिलेचा जीव घेतला. ५९ वर्षीय सुझान लिओपोल्डिना जिझस यांना पेसमेकर बसवण्यात आला होता. पण या शारीरिक स्थितीसह त्यांना एव्हरेस्टवर चढाईचा विक्रम करायचा होता.
बेस कॅम्पपासून अवघे २५० मीटर अंतर चढण्यासाठी सुझान यांना १२ तास लागले. यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना बळजबरीने लूकला रुग्णालयात नेल्यानंतर ६ दिवसांनी १८ मे रोजी त्यांना मृत्यू झाला.
ग्लेशियर हिमालय हायकिंग कंपनीच्या टेंडी शेर्पा यांनी सांगितले की, एव्हरेस्ट चढण्यापूर्वी सराव सत्रात सुझान यांना त्रास होऊ लागला होता.
१५ दिवसांत ४ मृत्यू -
एव्हरेस्टला जाणाऱ्या गिर्यारोहकाचा मृत्यू होण्याची ही गेल्या १५ दिवसांतील ही चौथी घटना आहे. मार्चमध्ये सुरू झालेल्या चालू हंगामात आतापर्यंत आठ चिनी आणि एका भारतीय गिर्यारोहकाचा एव्हरेस्टवर मृत्यू झाला आहे.
- १८ मे रोजी दक्षिण शिखराजवळ गिर्यारोहण करताना अज्ञात चिनी गिर्यारोहकाचा मृत्यू झाला. याच दिवशी मुंबईत राहणाऱ्या सुझान यांचे सहा दिवसांच्या आजारानंतर गुरुवारी सकाळी बेस कॅम्पमध्ये निधन झाले.
- १७ मे रोजी आजारी पडून कॅम्प-४ मध्ये मोल्दोव्हा येथील व्हिक्टर ब्रिन्जा या गिर्यारोहकाचा मृत्यू झाला.