‘पोर्नबंदी'साठी मुंबईची महिला सुप्रीम कोर्टात; नव-याविरुद्ध केली तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:20 AM2018-02-17T00:20:10+5:302018-02-17T00:20:19+5:30
पतीच्या पोर्न फिल्म्स (अश्लील चित्रफिती) पाहण्याच्या व्यसनामुळे आमचे वैवाहिक जीवन उद््ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पोर्नोग्राफीवर बंदी करण्यात यावी, अशी विनंती मुंबईतील २७ वर्षीय विवाहित महिलेने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.
नवी दिल्ली : पतीच्या पोर्न फिल्म्स (अश्लील चित्रफिती) पाहण्याच्या व्यसनामुळे आमचे वैवाहिक जीवन उद््ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पोर्नोग्राफीवर बंदी करण्यात यावी, अशी विनंती मुंबईतील २७ वर्षीय विवाहित महिलेने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.
या महिलेने म्हटले आहे की, ३५ वर्षे वयाचा आपला पती पोर्न फिल्म्स बघण्याच्या व्यसनात इतका बुडाला आहे की, दैनंदिन कामांवरुनही त्याचे लक्ष उडाले आहे. त्याचप्रमाणे लैंगिक संबंध राखताना तो विचित्र मागण्या करीत असतो. परस्परसंमतीने घटस्फोट घ्यावा, यासाठी तो माझ्या मागे लागला आहे. त्यासाठी त्याने कुटुंब न्यायालयात अर्जही केला आहे. देशात पोर्नोग्राफीवर सरसकट बंदी घालावी यासाठी अॅड. कमलेश वासवानी यांनी २०१३ साली सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत वादी म्हणून सामील करुन घेण्याची विनंती तिने न्यायालयास केली आहे.
चाइल्ड पोर्नोग्राफीच्या बंदीस केंद्र अनुकूल
पती पोर्नोच्या आहारी गेल्याने वैवाहिक जीवन मोडकळीला येण्याचा धोका निर्माण झाला आहे असे गाºहाणे आणखी एका महिलेने गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयासमोर मांडले होते. त्याचप्रमाणे १२ वी इयत्तेत शिकणाºया एका मुलाने पोर्नोग्राफी साइट्स ब्लॉक कराव्यात, अशी विनंती न्यायालयाला केली होती. सार्वजनिक ठिकाणी पोर्नोग्राफीवर बंदी घालता येईल का, याची चाचपणी न्यायालय करीत आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, आपण चाइल्ड पोर्नोग्राफीच्या साइट््सवर बंदी घालण्याच्या बाजूचे आहोत. त्या पुढील वयोगटासाठीही बंदी घातल्यास नागरिकांच्या खासगी हक्कावर गदा येऊ शकते. आम्हाला मॉरल पोलिसिंग करण्याची इच्छा नाही.
अत्यंत सहजपणे पोर्नो उपलब्ध असून त्याच्या जाळ््यात तरुण पिढी ओढली गेली आहे. त्यामुळे मूल्यांचा ºहास होत असून विकृतीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. तसेच लैंगिक गुन्हे, वैवाहिक समस्या यांचे प्रमाण वाढू शकेल, असे तिचे म्हणणे आहे.