सांगलीत अपघातात मुंबईची महिला ठार
By admin | Published: February 23, 2016 02:00 AM2016-02-23T02:00:54+5:302016-02-23T02:00:54+5:30
सहा जण गंभीर : कार भराव पुलावरून कोसळली
Next
स ा जण गंभीर : कार भराव पुलावरून कोसळलीकर्हाड (सांगली) : नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जाताना कार पुलावरून खाली कोसळून झालेल्या दुर्घटनेत मुंबईतील एका महिलेचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वहागाव (ता. कर्हाड) गावाच्या हद्दीत सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.सुनीता तानाजी पाटील (४५,, सध्या रा. चेंबूर-मुंबई, मूळ रा. तुळसण, ता. कर्हाड) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे तर गंभीर जखमी झालेल्या दीपक गोविंद मुरूडकर (३८, रा. मुंबई), शंकर मारुती भिसे, जगन्नाथ दादाजी पाटील, तानाजी बाबूराव पाटील, निर्मला आत्माराम पाटील, मंगल जगन्नाथ पाटील (सर्व रा. तुळसण, सध्या रा. मुंबई) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व कुटुंबीय रविवारी रात्री कारमधून मुंबईहून तुळसणला येण्यासाठी निघाले. पहाटे ते सातारा येथे पोहोचले. महामार्गानजीकच्या एका हॉटेलजवळ काहीवेळ थांबून त्यांनी चहा घेतला. त्यानंतर सर्वजण पुन्हा कारने कर्हाडच्या दिशेने येत होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वहागाव गावच्या हद्दीत पोहोचल्यानंतर अचानक चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार महामार्गावरील संरक्षक कठडा तोडून दगडी संरक्षण भिंतीवर जाऊन आदळली.संतोष भिसे (मूळ रा. तुळसण, सध्या रा. मुंबई ) यांनी अपघाताची खबर तळबीड पोलिसांत दिली आहे. त्यावरून कारचालक दीपक मुरुडकर (रा. मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)