मुंबईकरांना हवी शांतता, दिल्लीकरांना पाहिजे झाेप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 01:59 AM2021-03-12T01:59:13+5:302021-03-12T02:00:12+5:30

‘इंडियन जरनल ऑफ सायकियास्ट्री’ने काेराेना महामारीचा प्रभाव जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले हाेते.

Mumbaikars want peace, Delhikars want Zap | मुंबईकरांना हवी शांतता, दिल्लीकरांना पाहिजे झाेप

मुंबईकरांना हवी शांतता, दिल्लीकरांना पाहिजे झाेप

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काेराेना महामारीने सर्वांच्या चिंतेत भर टाकली. ध्यानसाधनेच्या मार्गाने वाढती चिंता आणि ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. या समस्येवर ऑनलाइन पर्यायही अनेकांनी शाेधले. परिणामी ध्यानसाधनेमध्ये माेठी वाढ दिसून आली आहे. याबाबतचे अनेक ॲपचे डाऊनलाेड माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यातून मुंबईकरांनी शांतता तर दिल्लीकरांनी चांगल्या झाेपेसाठी ध्यानसाधना केल्याचे आढळून आले आहे.

‘इंडियन जरनल ऑफ सायकियास्ट्री’ने काेराेना महामारीचा प्रभाव जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले हाेते. त्यातून ही माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षी २०१९च्या तुलनेत भारतात ध्यानसाधनेमध्ये तब्बल २५ पट वाढ दिसून आली आहे. भारतीयांनी दरराेज सरासरी ३० मिनिटे ध्यानसाधना केली आहे. मुंबईमध्ये ७० टक्के यूझर्सनी शांततेसाठी तर १० टक्के यूजर्सनी चांगल्या झाेपेसाठी ध्यानसाधना केली. त्याचप्रकारे दिल्लीमध्ये ८० टक्के यूजर्सनी चांगल्या झाेपेसाठी ध्यानसाधना केली. दिल्लीमध्ये एकूण ८० टक्के यूजर्स महिला हाेत्या. तर ६० यूजर्स हे नाेकरदार हाेते.

डाऊनलाेड्स वाढले
एका अहवालानुसार विविध मानसिक आराेग्य आणि वेलनेस ॲप्सचे जानेवारी २०२०च्या तुलनेत एप्रिल २०२० मध्ये जगभरात २० लाख अधिक डाऊनलाेड झाले. ‘ध्यान’ या देसी ॲपचे यूजर्स २०२० मध्ये ३३ पटींनी वाढले. केवळ १० टक्के यूजर्स हे १८ ते २५ वयाेगटांतील हाेते.

Web Title: Mumbaikars want peace, Delhikars want Zap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.