मुंबईतील स्मारकासाठी नोएडात बनणार डॉ. आंबेडकरांचा पुतळा; प्रख्यात मूर्तिकार राम सुतार यांना देण्यात आले काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 02:36 AM2018-09-04T02:36:36+5:302018-09-04T02:37:26+5:30

दादरच्या चैत्यभूमीजवळील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५0 फूट उंचीचा जो पुतळा उभारण्यात येणार आहे, तो तयार करण्याचे काम प्रख्यात मूर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर यांचा हा जगातील सर्वात उंच पुतळा असेल.

Mumbai's memorial will be built in Noida Ambedkar statue; Eminent sculptor Ram Sutar was given the job | मुंबईतील स्मारकासाठी नोएडात बनणार डॉ. आंबेडकरांचा पुतळा; प्रख्यात मूर्तिकार राम सुतार यांना देण्यात आले काम

मुंबईतील स्मारकासाठी नोएडात बनणार डॉ. आंबेडकरांचा पुतळा; प्रख्यात मूर्तिकार राम सुतार यांना देण्यात आले काम

Next

नवी दिल्ली : दादरच्या चैत्यभूमीजवळील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५0 फूट उंचीचा जो पुतळा उभारण्यात येणार आहे, तो तयार करण्याचे काम प्रख्यात मूर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर यांचा हा जगातील सर्वात उंच पुतळा असेल.
हा पुतळा दोन वर्षांत पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा आहे. पुतळा घडवण्याचे काम राम सुतार यांच्या नॉयडा येथील स्टुडिओमध्ये तयार करण्यात येणार असून, तिथे तयार करण्यात येणाऱ्या डिझाइनच्या आधारे चीनमध्ये पुतळ्याचा साचा बनवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. या साच्याद्वारे डॉ. आंबेडकर यांचा ब्राँझचा पुतळा तयार करण्यात येईल. याशिवाय इंदू मिलमध्ये तयार करण्यात येणाºया स्मारकामध्ये डॉ. आंबेडकरांचा २५ फूट उंचीचाही एक पुतळा असेल. तो राम सुतार यांनी याआधीच तयार केला आहे.
अरबी समुद्रात उभारण्यात येणाºया छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे स्मारक उभारण्यात येणार आहे, तेथील शिवरायांचा पुतळाही राम सुतारच करीत आहेत. याशिवाय गुजरातच्या भडोचमध्ये उभारण्यात येणाºया सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे कामही त्यांच्याकडेच आहे.
इंदू मिलच्या सुमारे साडेबारा एकर जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी अनेक आंदोलन केली. हे स्मारक १४ एप्रिल २0२0 पर्यंत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे. इंदू मिलची जमीन राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची म्हणजेच केंद्र सरकारची होती. ती गेल्या वर्षी राज्य सरकारच्या ताब्यात आली.

३५0 फूट उंच मूर्ती
इंदू मिल येथील स्मारकात डॉ. आंबेडकरांचा पुतळा, प्रदर्शन हॉल, चैत्यभूमीपर्यंत परिक्रमा मार्ग, बौद्ध स्थापत्य शैलीनुसार घुमट, संशोधन केंद्र, व्याख्यान सभागृह, डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके व ग्रंथ, त्यांच्यावरील, तसेच बौद्ध धर्माशी संबंधित जगभरातील ग्रंथ आदींचा समावेश असेल.

Web Title: Mumbai's memorial will be built in Noida Ambedkar statue; Eminent sculptor Ram Sutar was given the job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.