मनपा अर्थसंकल्प- भाग ४

By admin | Published: February 21, 2015 12:49 AM2015-02-21T00:49:57+5:302015-02-21T00:49:57+5:30

चौकट...

Municipal budget- Part 4 | मनपा अर्थसंकल्प- भाग ४

मनपा अर्थसंकल्प- भाग ४

Next
कट...

रस्त्यांसाठी आयआरआयपी प्रकल्प
आयआरडीपी (एकात्मिक रस्ते विकासयोजना ) अंतर्गत ज्याप्रमाणे नागपुरातील रस्त्यांचे चित्र बदलले होते त्याच धर्तीवर राज्य सरकार, महापालिका व नासुप्रतर्फे संयुक्तरीत्या एकात्मिक रस्ते सुधारणा प्रकल्प (आयआरआयपी) योजना राबविणयात येणार आहे. हा ३०० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत सिमेंट- कॉँक्रिटचे रस्ते तयार केले जातील. यात महापालिकेचाही वाटा असेल. या प्रकल्पाचा डीपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल) तयार करून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून तो या आर्थिक वर्षात मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

रस्ते डांबरीकरणासाठी ४२ कोटी
महापालिकेच्या मालकीच्या रस्त्यांचे डांबरीकरण, मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी अर्थसंकल्पात ४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही कामे हॉटमिक्स प्लांट विभागाकडून करून घेण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला असून त्यासाठी नवीन हॉटमिक्स प्लांट स्थापन करण्याचा संकल्पही व्यक्त केला आहे.

दोन डी.पी. रोड बांधणार
नागपूर शहर विकास आराखड्यातील दोन डी.पी. रोडचे बांधकाम करण्यासाठी आयुक्तांनी तरतूद केली आहे. उत्तर अंबाझरी मार्ग (मातृसेवा संघ) ते अमरावती रोड (म्युर मेमोरियल हॉस्पिटल समोर) १२ मीटर रुंद व ३९० मीटर लांबीच्या रस्त्याचे पुलासह बांधकाम करण्यासाठी ५.६८ कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. उत्तर अंबाझरी रोडवरील विद्यापीठ वाचनालय ते महाराज बाग चौकापर्यंतच्या रस्त्याचे २४ मीटर रुंदीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. या कामांसाठी ४.५७ कोटींच्या प्राकलनास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून दोन्ही डी.पी.रोडचे काम पुढील आर्थिक वर्षात पूर्ण केले जाणार आहे.

Web Title: Municipal budget- Part 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.