नगरसेवकांना महापालिकेने बजावल्या नोटिसा टांगती तलवार : बेकायदा बांधकामांना संरक्षण
By Admin | Published: September 26, 2015 07:27 PM2015-09-26T19:27:11+5:302015-09-26T19:27:11+5:30
डोंबिवली : बेकायदा बांधकामांचे संरक्षण केल्याप्रकरणी प्रशासनाने कल्याण डोंबिवली पालिकेतील चार नगरसेवकांना नगरसेवक पद रद्द करण्याच्या नोटिसा शुक्रवारी बजावल्या आहेत. यामध्ये शिवसेनेचे तीन व काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. शिवसेनेच्या एका नगरसेवकाला पद रद्द करण्याची नोटीस पाठविल्यानंतर शनिवारी प्रशासनाने उर्वरित चार नगरसेवकांना नोटिसा पाठवल्या. अश ाप्रकारे सर्व पक्षांमधील एकूण दहा नगरसेवकांचा पद रद्द करण्याच्या यादीत समावेश झाला आहे. काँग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे, शिवसेनेचे दोन नगरसेवक, अपक्ष शिवसेना समर्थक नगरसेवक विद्याधर भोईर यांना आयुक्त ई. रवींद्रन यांनी नोटीसा बजावल्याचे सांगण्यात आले. प्रभाग अधिकार्यांनी माहिती दिल्यानंतर कागदपत्रांची पड
ड ंबिवली : बेकायदा बांधकामांचे संरक्षण केल्याप्रकरणी प्रशासनाने कल्याण डोंबिवली पालिकेतील चार नगरसेवकांना नगरसेवक पद रद्द करण्याच्या नोटिसा शुक्रवारी बजावल्या आहेत. यामध्ये शिवसेनेचे तीन व काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. शिवसेनेच्या एका नगरसेवकाला पद रद्द करण्याची नोटीस पाठविल्यानंतर शनिवारी प्रशासनाने उर्वरित चार नगरसेवकांना नोटिसा पाठवल्या. अश ाप्रकारे सर्व पक्षांमधील एकूण दहा नगरसेवकांचा पद रद्द करण्याच्या यादीत समावेश झाला आहे. काँग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे, शिवसेनेचे दोन नगरसेवक, अपक्ष शिवसेना समर्थक नगरसेवक विद्याधर भोईर यांना आयुक्त ई. रवींद्रन यांनी नोटीसा बजावल्याचे सांगण्यात आले. प्रभाग अधिकार्यांनी माहिती दिल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून आयुक्तांनी चार नगरसेवकांना पद रद्द करण्याच्या नोटिसा बजावून तीन दिवसात खुलासा करण्यास सांगितले आहे. पोटे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका बांधकाम प्रकरणात यापूर्वी दिले आहेत. तर अनधिकृत बांधकामप्रकरणी लाच मागितल्या प्रकरणी भोईर याना रंगेहाथ पकडले होते. काही दिवस ते पोलीस कोठडीत होते. मात्र, पालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने त्यांची तत्कालीन आयुक्तांनी पदाधिकार्यांच्या मागणीवरून पाठराखण केली होती. ----------------चौकट काँग्रेससह भाजपा, मनसेचे नगरसेवक यांचा बेकायदा बांधकामांशी संबंध आहे का, यासंबंधीच्या कागदपत्रांची प्रशासन छाननी करीत आहे, असे पालिका अधिकार्यांनी सांगितले. गेल्या पंधरा वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात नगरसेवकांची बेकायदा बांधकामांवरून नगरसेवक पद रद्द करण्याची कारवाई प्रशासनाकडून पहिल्यांदाच करण्यात येत आहे.---------------कोट : नव्या कायद्यातील तरतुदीनुसार नोटीस बजाविण्याचे आदेश दिले आहेत, नेमक्या किती जणांना नोटीस दिल्या याबाबतची सविस्तर माहिती सोमवारी संबंधित नोडल ऑफीसर (वॉर्ड अधिकारी) देतील.- संजय घरत, अतिरीक्त आयुक्त केडीएमसी.............