पदभार सोडल्यावरही नगररचनाच्या फाईल्सला मंजुरी मनपा: आयुक्तांच्या बंगल्यावर शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत चालली वर्दळ

By admin | Published: June 20, 2016 12:21 AM2016-06-20T00:21:33+5:302016-06-20T00:21:33+5:30

जळगाव: मनपा आयुक्त पदाचा पदभार शुक्रवारीच नवीन आयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे सोपविल्यानंतरही शनिवारी रात्री उशीरापर्यंत मावळते आयुक्त संजय कापडणीस यांनी नगररचना विभागातील फाईल्सला मागील तारखेने मंजुरी दिल्याचे समजते. त्यासाठी बंगल्यावर नगररचना विभागाच्या अभियंत्यांची व संबंधीतांची वर्दळ सुरू होती.

Municipal corporation: Municipal corporation's permission to file municipal corporation files till 9 pm on Saturday night | पदभार सोडल्यावरही नगररचनाच्या फाईल्सला मंजुरी मनपा: आयुक्तांच्या बंगल्यावर शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत चालली वर्दळ

पदभार सोडल्यावरही नगररचनाच्या फाईल्सला मंजुरी मनपा: आयुक्तांच्या बंगल्यावर शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत चालली वर्दळ

Next
गाव: मनपा आयुक्त पदाचा पदभार शुक्रवारीच नवीन आयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे सोपविल्यानंतरही शनिवारी रात्री उशीरापर्यंत मावळते आयुक्त संजय कापडणीस यांनी नगररचना विभागातील फाईल्सला मागील तारखेने मंजुरी दिल्याचे समजते. त्यासाठी बंगल्यावर नगररचना विभागाच्या अभियंत्यांची व संबंधीतांची वर्दळ सुरू होती.
मनपा नगररचना विभागातील गैरकारभाराबाबत मनपा महासभेत सातत्याने ओरड होत आहे. माजी आयुक्त संजय कापडणीस यांच्या कार्यकाळात या विषयी सर्वाधिक आरोप-प्रत्यारोप झाले. नगररचना सहायक संचालक चंद्रकांत निकम यांच्यावर तर बडतर्फीची कारवाई करण्याची शिफारस करणारा ठरावच महासभेने केला. मात्र नंतर तो सोयीने बदलण्यात आला. त्यामुळेच प्रशासनाचेही चांगलेच फावले. फ्लॅट सिस्टीमच्या मंजुरीसाठीचे दर प्रति फ्लॅट २० ते ३० हजारांपर्यंत गेल्याची ओरड नगरसेवकांकडूनच होत होती. मध्यंतरी टीडीआरबाबत शासनाचे नवे धोरण येताच सुमारे ३०० फाईल्स आयुक्तांनी अडवून ठेवल्याचा आरोप झाला होता. नंतर त्या फाईल्सची बंगल्यावरून मंजुरी होऊन निपटारा झाला होता. आयुक्त कापडणीस यांच्या बदलीचे आदेश गुरूवार १६ रोजी आले. १७ जून रोजी नवीन आयुक्त किशोर बोर्डे सायंकाळी मनपात रूजू झाले. त्यांनी पदभारही घेतला. मात्र नगररचना विभागातील बांधकाम, भोगवटा प्रमाणपत्र, ले-आऊट मंजुरी आदी विषयांच्या अनेक फाईल्स व्यवहार न जमल्याने अडविण्यात आलेल्या होता. त्या मावळत्या आयुक्तांनी शनिवारी दिवसभरात मागील तारखेने मंजुर केल्याचे समजते. त्यासाठी नगररचना विभागातील अभियंते फाईल्स घेऊन मावळत्या आयुक्तांच्या बंगल्यावर गेलेले होते. तर नूतन आयुक्त किशोर बोर्डे हे मात्र मनपात आपल्या दालनात बसलेले होते. कापडणीस यांच्या बंगल्यावर रात्री ९ वाजेपर्यंत हा फाईल्स मंजुरीचा घोळ सुरू असल्याचे समजते.

Web Title: Municipal corporation: Municipal corporation's permission to file municipal corporation files till 9 pm on Saturday night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.