जानेवारीअखेर अनधिकृत धार्मिक स्थळे तोडणार पालिकेचे प्रतिज्ञापत्र : वक्फ बोर्डाने दिले धार्मिक स्थळे न तोडण्याचे पत्र

By admin | Published: November 19, 2015 09:58 PM2015-11-19T21:58:31+5:302015-11-19T21:58:31+5:30

जळगाव- शहरातील २००९ नंतरचे अनधिकृत सात धार्मिक स्थळे ३१ जानेवारी २०१६ पर्यंत तोडले जातील, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र महापालिकेने शासनाला दिले आहे.

Municipal Corporation's premature declaration of unauthorized religious places will be cut by January | जानेवारीअखेर अनधिकृत धार्मिक स्थळे तोडणार पालिकेचे प्रतिज्ञापत्र : वक्फ बोर्डाने दिले धार्मिक स्थळे न तोडण्याचे पत्र

जानेवारीअखेर अनधिकृत धार्मिक स्थळे तोडणार पालिकेचे प्रतिज्ञापत्र : वक्फ बोर्डाने दिले धार्मिक स्थळे न तोडण्याचे पत्र

Next
गाव- शहरातील २००९ नंतरचे अनधिकृत सात धार्मिक स्थळे ३१ जानेवारी २०१६ पर्यंत तोडले जातील, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र महापालिकेने शासनाला दिले आहे.
ही स्थळे तोडण्यासंबंधी जिल्हा प्रशासनाला अभिप्राय मागविला आहे. तसेच पोलिसांचे नियोजन कसे असेल, काय स्थिती निर्माण होऊ शकते व कशी तयारी प्र्रशासनाला करावी लागेल, आदी माहितीही पालिकेने पोलीस दल व जिल्हा प्रशासनाकडून मागविली आहे.
न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळे तोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पालिकेने शहरात सर्वेक्षण करून अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती गोळा केली होती. त्याची माहिती शासनाला कळविली आहे. आता शासनाने ही स्थळे कधी तोडली जातील यासंबंधीही पालिकेकडून अहवाल व उत्तर मागविले होते. त्यास पालिका प्रशासनाने उत्तर दिले असून, ३१ जानेवारीअखेर ही अनधिकृत स्थळे तोडली जातील, असे प्रतिज्ञापत्रच दिले आहे.

वक्फ बोर्डाने धार्मिक स्थळे न तोडण्याचे दिले पत्र
पालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे तोेडण्यासंबंधी प्रतिज्ञापत्र दिले असतानाच वक्फ बोर्डाने मात्र लोकांच्या धार्मिक भावना धार्मिक स्थळांशी जुळलेल्या असतात. ही स्थळे तोडण्याची कारवाई पालिकेने करू नये, असे पत्र दिल्याची माहिती मिळाली. वक्फ बोर्डाच्या या पत्रामुळे पालिकेसमोर मात्र नवीन पेच उभा राहणार आहे.

Web Title: Municipal Corporation's premature declaration of unauthorized religious places will be cut by January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.