बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी महापालिकेची निवासी शाळा
By admin | Published: March 23, 2015 04:54 PM2015-03-23T16:54:51+5:302015-03-23T16:54:51+5:30
पुणे : वेगाने वाढत असलेल्या पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरू आहे, त्याकरिता हजारो बांधकाम मजूर घाम गाळत आहेत. त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत याकरिता बांधकाम मजुरांच्या मुलांकरिता विशेष निवासी शाळा महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात येणार आहेत. त्याची पुढील कार्यवाही सुरू करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी शिक्षण मंडळाच्या अधिकार्यांना दिले आहेत.
Next
प णे : वेगाने वाढत असलेल्या पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरू आहे, त्याकरिता हजारो बांधकाम मजूर घाम गाळत आहेत. त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत याकरिता बांधकाम मजुरांच्या मुलांकरिता विशेष निवासी शाळा महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात येणार आहेत. त्याची पुढील कार्यवाही सुरू करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी शिक्षण मंडळाच्या अधिकार्यांना दिले आहेत.शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व घटकांमधील मुलांना शिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. बांधकाम मजूर हे कामाच्या निमित्ताने सतत स्थलांतर करीत असतात, त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. महापालिका, नगरपालिकांनी त्यांच्या भागातील शाळाबाहय मुलांचे सर्व्हेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या सुचना देण्यात आहेत. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी यासंदर्भात शिक्षण मंडळाच्या अधिकार्यांची बैठक घेतली. शाळाबाहय मुलांना प्रवाहात आणण्यासाठी गेल्या २ वर्षापासून अंदाजपत्रकामध्ये २० लाख रूपयांची तरतूद करण्यात येत आहे, मात्र प्रत्यक्षात त्याचा वापरच केला जात नाही. यापार्श्वभुमीवर निवासी शाळा सुरू करण्याच्या दिशेने योग्य ती पावले उचलण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. निवासी शाळांसाठी प्रस्तावित करण्यात आलेला निधी कमी पडल्यास अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली असल्याची माहिती महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य बाळासाहेब जानराव यांनी दिली. निवासी शाळा सुरू करण्याबाबत गेल्या दोन वर्षापासून उशीर झाल्याबदद्ल त्यांनी नाराजी व्यक्त केली.