खून प्रकरणातील तिघांना जन्मठेप - असिफ पटेल खून प्रकरण
By Admin | Published: December 31, 2014 12:06 AM2014-12-31T00:06:00+5:302014-12-31T18:57:15+5:30
नेवासा : (अहमदनगर) चार वर्षांपूर्वी झालेल्या येथील असिफ पटेल खून प्रकरणातील नऊ पैकी तीन आरोपींना जन्मठेप व २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला़ तर पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली़ नेवासा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद कुलकर्णी यांनी हा निकाल दिला़
नेवासा : (अहमदनगर) चार वर्षांपूर्वी झालेल्या येथील असिफ पटेल खून प्रकरणातील नऊ पैकी तीन आरोपींना जन्मठेप व २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला़ तर पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली़ नेवासा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद कुलकर्णी यांनी हा निकाल दिला़
सोपान ऊर्फ सोप्या भगवान गाढे (वय २२), धनू ऊर्फ धनंजय ऊर्फ गोविंद अशोक काळे (वय २२) व बिट्टू ऊर्फ अनिल चिमाजी लष्करे (वय ३२) या तीन आरोपींना जन्मठेपेसह २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला़ दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली़ दरम्यान याच गुन्ह्यात फरार असलेला व काही दिवसापूर्वी पोलिसांनी अटक केलेला आरोपी सोन्या ऊर्फ सुनील मोहन परदेशी याच्यावर सुरू असलेला खटला प्रलंबित आहे.
दि़ ३१ ऑगस्ट २०११ रोजी ईद सणा दरम्यान नेवासा शहरात जातीय दंगल घडली होती. त्यावेळी हलीमाबी युसूफ पटेल यांचे गंगानगर भागातील घर जाळण्यात आले होते. घर जळाल्याची फिर्याद हलीमाबी पटेल यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर याच आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याचा राग धरून १३ सप्टेंबर २०११ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान नेवासा शहरालगतच्या खुपटी रोड वर असिफ युसुफ पटेल (वय ३८) यांच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला. अशा आशयाची फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती़ घटनेनंतर सोपान ऊर्फ सोप्या भगवान गाढे (२२), धनू ऊर्फ धनंजय ऊर्फ गोविंद अशोक काळे (२२), बिट्टू ऊर्फ अनिल चिमाजी लष्करे (३२), रवींद्र बबन काळे (२५), संतोष जगन्नाथ पंडुरे (३२), राजेंद्र कारभारी काळे (३४), आंबादास लक्ष्मण धोत्रे (२६), संजय लक्ष्मण सुकदान (३१) व सोन्या ऊर्फ सुनील मोहन परदेशी (३०) यांचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आठ आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते तर सुनील परदेशी हा फरार होता.
अपूर्ण़़़़़़़़़़़़