लखनऊ मध्ये दोन साधूंची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 04:28 AM2018-08-16T04:28:57+5:302018-08-16T04:30:48+5:30
अज्ञात मारेकऱ्यांनी मंदिरात घुसून दोन साधूंची हत्या केली, शिवाय एका साधूला गंभीर जखमी केले. घटनेच्या निषेधार्थ आराया जिल्ह्यातील बिधुना भागात हिंसाचार उफाळल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लखनऊ : अज्ञात मारेकऱ्यांनी मंदिरात घुसून दोन साधूंची हत्या केली, शिवाय एका साधूला गंभीर जखमी केले. घटनेच्या निषेधार्थ आराया जिल्ह्यातील बिधुना भागात हिंसाचार उफाळल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जमावाने काही दुकाने जाळली, शिवाय दगडफेक केली. हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. सध्या स्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कानपूर रेंजचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अविनाश चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिधुना पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या कुदारकोट भागातील भयानकनाथ मंदिर परिसरात दोन्ही साधू रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. त्यांच्या मानेवर तसेच शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या.
हत्येमागील हेतू काय होता, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गोहत्येला विरोध केल्यामुळे हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गृहखात्याचे प्रधान सचिव तसेच राज्य पोलीस महासंचालकांसह सर्व अधिकाºयांना घटनेचा ४८ तासांत छडा लावून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मृत दोन्ही साधूंच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी पाच लाख तसेच जखमी असलेल्या अन्य एका साधूला एक लाखाची मदत जाहीर केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत प्रवक्त्याने दिली. (वृत्तसंस्था)