घोडा बाळगणाऱ्या दलित तरुणाची हत्या; तीन जणांना केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:39 PM2018-03-31T23:39:33+5:302018-03-31T23:39:33+5:30
एक दलित तरुण घोडा विकत घेता आणि त्यावर बज्ञनु गावातून फिरतो, हे सहन न झाल्याने गावातील काही जणांनी त्याची हत्या केल्याचे प्रकरण गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील टिंबी गावात घडले. याप्रकरणी पोलिसांनी शेजारच्या गावातील तीन जणांना अटक केली आहे.
अहमदाबाद : एक दलित तरुण घोडा विकत घेता आणि त्यावर बज्ञनु गावातून फिरतो, हे सहन न झाल्याने गावातील काही जणांनी त्याची हत्या केल्याचे प्रकरण गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील टिंबी गावात घडले. याप्रकरणी पोलिसांनी शेजारच्या गावातील तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास भावनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
टिंबी गावाती प्रदीप राठोड या २१ वर्षांच्या तरुणाने दोन महिन्यांपूर्वी ३0 हजार रुपयांना एक घोडा विकत घेतला होता. त्या दिवसापासून त्याला गावातील काही लोक धमक्या देत होते.त्यामुळे त्याने घोडा विकण्याचा निर्णय घेतला होता आणि तो त्यासाठी गिºहाईक शोधत होता. पण त्याआधीच गुरुवारी रात्री प्रदीपची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
त्याचे वडील कालुभाई राठोड म्हणाले की, त्याने घोडा विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर मी त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. तो नेहमीप्रमाणे घोड्यावरून शेतावर गेला. तो परतल्यावर आम्ही एकत्र जेवणार होतो. तसे तो सांगून गेला होता. पण तो बराच वेळ आला नाही. त्यामुळे आम्ही त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, शेताकडे जाण्याच्या रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह सापडला.
या घटनेमुळे टिंबी गावात तणाव असून, दलित वस्तीमध्ये संताप व भीतीचे वातावरण आहे. (वृत्तसंस्था)
मिटवण्याची केली होती विनंती
आपणास काही लोक धमक्या देत असल्याचे प्रदीपने मला सांगितले होते. त्यामुळे धमकी देणाºयांच्या नातेवाईकांना मी स्वत: भेटलो होता. माझ्या मुलाला धमकी देऊ नका, प्रकरण मिटवा, अशी विनंती मी त्यांना केली होती. माझ्या मुलाने घोडा घेतल्याने त्यांना काय त्रास होता, हे मला अद्याप समजलेले नाही, असे कालुभाई राठोड यांनी सांगितले.