गाळ काढण्यावरूनही मतभिन्नता गाळ नसून मुरूम : प्रशासन म्हणते गौणखनिजाची उघडपणे होईल चोरी

By admin | Published: April 18, 2016 12:47 AM2016-04-18T00:47:23+5:302016-04-18T00:47:23+5:30

मेहरूण तलाव समस्या

Murmu: There is no difference of opinion on mud removal, says administration; | गाळ काढण्यावरूनही मतभिन्नता गाळ नसून मुरूम : प्रशासन म्हणते गौणखनिजाची उघडपणे होईल चोरी

गाळ काढण्यावरूनही मतभिन्नता गाळ नसून मुरूम : प्रशासन म्हणते गौणखनिजाची उघडपणे होईल चोरी

Next
हरूण तलाव समस्या

जळगाव : मेहरूण तलावाच्या खोलीकरणासाठी जलसंपदा विभागाकडूनही मदत मिळणार असल्याचे महापौरांनी सांगितले असताना प्रशासनाच्यामते मात्र तलावात गाळ नसून सर्वत्र मुरूम आहे. त्यामुळे हा मुरूम फुकटात वाहून नेण्यास परवानगी देणे म्हणजे गौणखनिजाची उघडपणे चोरी करण्याची परवानगी दिल्यासारखे होईल. तरीही खोलीकरण करावयाचे असल्यास महसूल विभागाकडून या तलावातील मुरूमावरील रॉयल्टी माफ करून घ्यावी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावाची वाताहत गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. हे वैभव टीकवून ठेवण्यासाठी काही प्रयत्नांची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. गळतीमुळे तलावातील पाणीसाठा वाहून जात असताना त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत आहे. तर तलावाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी तलावाचे खोलीकरण करण्याची आवश्यकता आहे.
महापौरांनी यासंदर्भात जलसंपदा विभागाकडून सहकार्य मिळणार असल्याचे शनिवारी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात तलावात गाळ नसून मुरूमच असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळेच जलदिनी तलावातील गाळ काढण्याची मोहीम राबविण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावास आयुक्तांनीच विरोध केला होता, असे समजते. तलावातील गाळ काढण्याची मोहीम २०१३ मध्ये राबविण्यात आली होती. मात्र त्यामुळे शेतकर्‍यांऐवजी गौण खनिजाचा व्यवसाय करणार्‍यांनीच त्याचा गैरफायदा उचलला होता. त्यामुळे पुन्हा तशी चूक होऊ देणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
---------
...तर महसूलची परवानगी आवश्यक
मनपाला तलावाचे खोलीकरण करावयाचे असल्यास हा मुरूम काढण्यासाठी व तो विनामोबदला नागरिकांना देण्यासाठी महसूल विभागाकडून परवानगी मिळविणे आवश्यक आहे.

Web Title: Murmu: There is no difference of opinion on mud removal, says administration;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.